Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १२ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
सनराईज प्रशालेत राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी...
सनराईज प्रशालेत राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी...
परंडा (राहूल शिंदे)दि.१२ तालुक्यातील शेळगाव येथील सनराईज स्कूल आणि ज्यु. कॉलेज ऑफ कॉमर्स या प्रशालेत स्वराज्य जननी राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक संभाजी देवकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक गणेश खरसडे, बाळासाहेब जामदारे हे लाभले. मुख्याध्यापक संभाजी देवकर व प्रमुख पाहुणे यांनी माँ.जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले.या कार्यक्रमाचे खास आकर्षण माँसाहेब जिजाऊ यांच्या वेशभूषेतील विद्यार्थिनी ठरल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल शिंदे यांनी केले .प्रकाश शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि सुरेखा दैन,सुरेखा चौधरी,निकिता करळे,किर्ती गांगर्डे यांनी मनोगते व्यक्त केली तसेच विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली,यावेळी मुख्याध्यापक देवकर यांनी माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याविषयी माहिती दिली.तानाजी आमटे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. या वेळी पालक वर्ग उपस्थितीत होते.सूर्यकांत औताडे,संतोष भिल्लारे,महादेव भोगील ,लहू भोगील या शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा