Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
छत्रपती शिवाजी महाराजांचा या सरकारला एवढा द्वेष का ? धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे 19 फेब्रुवारीच्या पूजनास विरोध का ?
छत्रपती शिवाजी महाराजांचा या सरकारला एवढा द्वेष का ? धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे 19 फेब्रुवारीच्या पूजनास विरोध का ?
भाजपाचे राज्यात, केंद्रात सरकार, शिंदखेडा मतदारसंघात भाजपाचे आमदार, खासदार अशी परिस्थिती असताना हिंदुत्वाच्या डंका बजावणारे भाजपाने छत्रपती शिवाजींच्या पुतळ्याच्या पूजनास आणि स्थापनेस विरोध का ?
महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी या गावात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणी प्रसंगी जे अनुभवायला मिळाले ते फार भयानक व मनाला वेदना देणारे प्रकरण आहे. शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी ग्रामस्थांनी आपल्या गावात भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळा उभारावा यासाठी गावकऱ्यांनी लोक वर्गणी करून तेथे भव्य दिव्य पुतळा उभा केला शासनाची किंवा आमदार, खासदारांची मदत न घेता अशा पद्धतीने पुतळा उभा करून फक्त आमदारांनी परवानगी आणून द्यावी एवढीच रास्त अपेक्षा असताना.... ना परवानगी .... ना प्रतिमापूजनाची परवानगी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार जयकुमार रावल यांचा भाजपा शासनाच्या काळात प्रशासनावर अंकुश आहे परवानगीचे काय घेऊन बसल्यात बेकायदेशीर काम देखील सर्रासपणे करून घेता येतात असे परिचय असणारे विद्वान, धनवान, लढवये आमदार जयकुमार रावळ यांनी वाघाडी ग्रामस्थांना स्पेशल मूर्ख बनवले.
वाघाडी तालुका शिंदखेडा येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला, मान्यता नसल्यामुळे पेच निर्माण झाला आणि ग्रामस्थ व प्रशासन यांच्यात संघर्ष वाढला त्यात विविध पक्षांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे स्थानिक आमदार हे भाजपाचे असल्यामुळे त्यांनी ग्रामस्थां समोर येऊन भेट दिली, सर्व गावकऱ्यांसमोर जिल्हाधिकारी महोदय, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला व सर्वांना छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनधिकृत बांधकामा संदर्भात माहिती दिली आणि विनंती ही केली की छत्रपती शिवरायांचे जयंती नंतर सदर पुतळा हा जागेवरच बंद करण्यात येईल व मान्यतेनंतर खुला करण्यात येईल ,त्याच वेळी जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांनी 21 तारखे नंतर सदर पुतळा बंद करू जनतेसमोर स्थानिक आमदारांना आश्वासन दिले? तसे आमदारांनी समस्त वाघाडीकर ग्रामस्थांना शब्द दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन 19 फेब्रुवारी ला तुम्हा ग्रामस्थांना करता येईल.मात्र वाघाडीकर ग्रामस्थांना अनुभव वेगळाच आला अर्ध्याच तासात पोलीस विभाग महसूल विभाग व ग्रामपंचायत पंचायत समिती विभाग तात्काळ गावात आला आणि सदर पुतळा संध्याकाळपर्यंत काढून घ्यावा अन्यथा ग्रामपंचायत बरखास्त करू तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील यांना निलंबीत करू आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करू असा इशारा वजा धमकीचा संदेश बैठकीत दिला? स्थानिक आमदारांनी सर्व प्रशासनाला विनंती केल्याचे वातावरण निर्माण केले त्यानंतर रात्री दोन वाजता दोनशे पोलीस, 200 महिला पोलीस, पंचवीस अधिकारी, अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख, प्रांत अधिकारी, तहसीलदारांसह 43 गाड्यांचा ताफा अश्वारूढ पुतळा काढण्यासाठी निघालेत, हा प्रसंग पाहून वाटले हा महाराष्ट्र माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन रोखण्यासाठी आणि पुतळ्या काढण्यासाठी एवढा भव्य दिव्य ताफा कोणा गुन्हेगाराला किंवा अवैध धंदे बंद करण्यासाठी किंवा देशद्रोही किंवा अतिरेकीला त पकडण्यासाठी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा काढण्यासाठी वापरला जातो ही फार महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. यावरून शेवटी असे म्हणावेसे वाटते की भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेचे सरकारचे ध्येय धोरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधातआहे का? भाजपचे राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या बाबत केलेले हिन वक्तव्य हाच खरा भाजपच्या चेहरा आहे का? असे एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यांना इतका द्वेश आहे का? असे एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
महाराष्ट्र राज्यातील भारतीय जनता पार्टी आणि फुटीर शिवसेना पक्ष यांचे प्रशासन विरुद्ध शिवप्रेमी जनता असा संघर्ष पेटला.... प्रशासन पुतळा काढायचाच हा मनसुबा घेऊन आगे कूच करत होता! वाघाडीच्याच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात तीन दिवसांचा कलम 144 चा स्वतंत्र आदेश घेऊन दाखल झालेत? प्रशासन त्या ठिकाणी जनतेला आव्हान करत होते की 144 कलम लागू असल्या कारणास्तव पाच लोकांच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी गर्दी करण्यात येऊ नये असा संदेश वारंवार त्या ठिकाणी बजावण्यात येत होता. प्रशासन आणि जनता यांच्यात खूप कलगीतुरा रंगला दोन तास एकूणच काही स्थानिक पक्षाचे पदाधिकारी आणि जनता आणि प्रशासनाचा संघर्ष चालला मार्ग निघाला की छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा चौथर्यावरून उचलून इतरत्र स्वतःहून काढून घ्यावा अन्यथा आपण स्वतःहून जर काढला नाही तर प्रशासन मात्र हा पुतळा काढून प्रशासनाच्या सोयीनुसार सदर पुतळ्याला प्रशासन ताब्यात घेईल अशा अटी व प्रश्नांचा भडीमार करू लागले .. शेवटी चार वाजता ग्रामस्थ व प्रशासनामध्ये निर्णय झाला की सदर अश्वारूढ पुतळा चौथर्यावरून उचलून बाजूच्या जागेवरच ठेवण्यात यावा याबाबतीत निर्णय झाला. जनतेच्या मनात सदर पुतळा जागेवरच बंदिस्त करण्यात यावा यासाठी वारंवार आग्रह करत होते. पण प्रशासन मात्र चौथरावरून उचलून खाली ठेवण्यासाठी किंवा इतरत्र ठेवण्यासाठी आग्रही होते. पण प्रशासनास शेवटी बाजूलाच ठेवण्याचा निर्णय मान्य करावा लागला. पुतळा काढण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली दोन तास झालेत पुतळा जागचा हालेना प्रशासनाला पुतळा जागेवरून निघतच नाही इतका घट्ट पुतळा बसवण्यात आलेला पाहिल्यानंतर जिल्हा प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर पुतळा त्याच जागेवर बंदिस्त करण्याचा निर्णय प्रशासनाला नाईलाजाने घ्यावा लागला. म्हणजेच जे जनतेच्या मनात होते तेच त्यांना हा सर्व द्रविड प्राणायाम करून निर्णय घ्यावा लागला. महाराष्ट्रात भाजपाचे सरकार असणाऱ्या प्रशासनाचे हे दुर्देवच म्हणावा लागेल. पुतळा एवढा घट्ट बसवलेला होता की तो प्रशासनाकडून निघणं अवघड झाले.. शेवटी हातबल झालेल्या प्रशासन यांनी निर्णय घेतला की पुतळा जागेवरच बंदिस्त करण्यात यावा... सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला, तरुण, हे प्रशासनाला ओरडून ओरडून सांगत होते की आमचे छत्रपती शिवराय जागेवरून हलणार नाहीत पण भाजपाचे प्रशासन मात्र इरशेला पेटून पुतळा काढणारच या भावनेने पेटून उठलेले वाघाडीकरांनी पाहिले... शेवटी भाजपाचे आणि फुटीर शिवसेनेचे प्रशासन हरले ... महाराज जिंकले.... पुतळा जागच्या जागी बंदिस्त करावा लागला गावाच्या जनभावना त्याच होत्या पण त्या भाजपाच्या आमदाराला आणि प्रशासनाला कळाल्या नाहीत? लोकप्रतिनिधी येतात..... प्रशासनाला सांगतात... तात्काळ प्रशासन कामाला लागतं...प्रशासन मार्फत ग्रामपंचायत वर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते कर्मचारी निलंबित केले जातील तरुण कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतील असा दम वजा धमकी दिली जाते... आमदार जयकुमार रावळ यांनी मग हा सर्व द्रविड प्रणायम कशासाठी व का केला? हा प्रश्न वाघाडीकर व शिंदखेडा तालुक्यातील शिवप्रेमींच्या मनाला भेडसावत आहे? जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेल्या शब्द हा गावातील एखाद्या कार्यकर्त्याला नसून स्थानिक आमदार माजी मंत्री जयकुमार जी राऊळ यांनाच होता आणि स्थानिक आमदार देखील ज्या पक्षाचे महाराष्ट्रात सरकार आहे त्याच पक्षातील ते आमदार व माजी मंत्री आहेत तरीही त्यांच्या शब्दाच्या उलट प्रशासन गतीने कामाला लागले आणि विनंती केल्यानंतर काही तासातच प्रशासन एवढे सज्ज झाले की जणू वाघाडीत कसाब सारखाच अतिरेकी आलेला आहे की काय? असा बंदोबस्त घेऊन प्रशासन वाघाडीत येण्याचे कारण काय हे वाघाडीकर पण समजू शकले नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या राजवटीत माजी मंत्री व स्थानिक आमदारांच्या शब्दाची किंमत जनतेला नक्कीच कळलेली आहे ! जनतेच्या मनात जी भावना होती अखेर प्रशासनाला अपयश आल्यानंतर छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा जैसे थे ठेवावा लागला मग आता जे गुन्हे दाखल झाले जे नीलंबने झालेले आहेत त्यासाठी कुणाला जबाबदार धरले पाहिजे याचे उत्तर वाघाडीकर व शिंदखेडा तालुक्यातील शिवप्रेमी जनता निश्चित विचारल्याशिवाय राहणार नाही ? जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्थानिक आमदारांचा शब्द का पाळला नाही हे देखील शिंदखेडा तालुक्यातील जनतेच्या लक्षात आलेले आहे की स्थानिक आमदारांचे प्रशासनावरच अंकुश राहिला नाही की भाजपालाच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार महाराष्ट्रात तळागाळापर्यंत जाऊ द्यायची नाही ही विचारसरणी तर कारणीभूत नाही ना?असा देखील प्रश्न उपस्थित राहिल्या शिवाय राहत नाही? भ्रमणध्वनी वरून स्पीकर फोनवरून केलेली विनंती प्रशासनाने मान्य केले नाही व लगेच प्रशासनाने अश्वारूढ पुतळा काढण्याच्या संदर्भात केलेली तातडीची कार्यवाही या गोष्टींमध्ये प्रशासन व स्थानिक आमदारांच्या भूमिकेबद्दलही कुजबूज व संशय निर्माण झाला आहे.
AVB माझा न्युज चॅनल सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा