Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
व्ही.के.पाटील इंटर नॅशनल स्कूल येथे लेट फी च्या नावाखाली पालकांची आर्थिक पिळवणुक
व्ही.के.पाटील इंटर नॅशनल स्कूल येथे लेट फी च्या नावाखाली पालकांची आर्थिक पिळवणुक
शिंदखेड़ा प्रतिनिधी - शिंदखेडा येथील व्ही.के.पाटील इंटर नॅशनल स्कूल म्हणून इंग्रजी माध्यमाची खाजगी शाळा आहे येथे १ ली ते १० वी पर्यंत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले जाते. त्या बदल्यात पालकांकडून ट्यूशन फी म्हणून फी वसूल केली जाते.ज्यांची फी बाकी आहे असे बहुतेक मुलांचे आई वडील मोल मजूरी किंवा शेतीकाम करून पोरांची फी भरत असतात आता दुसऱ्या हफ़्त्याची फी जमा करने सुरु असून फी सोबत लेट फी (पेनल्टी ) म्हणून प्रत्येक पालकांकडून ६०० रु जास्तीचे घेतले जात आहेत.त्या कारणावरुन शाळेत दररोज वाद होत आहेत.एवढेच नव्हे तर ज्या मुलांची फी बाकी आहे अश्या मुलांना दररोज वर्गाच्या बाहेर उभे केले जात आहे. परीक्षा जवळ आल्या असून अश्या प्रकारचे कृत्य शाळेत सुरु आहे.
त्यामुळे विद्द्यार्थ्यांची मानसिकता खराब होत असून त्याचा अभ्यासावर परिणाम होत आहे.याबाबत पालकांनी फी व्यतिरिक्त आकारण्यात येत असेलेल्या फी बाबत विचाराना केली असता.शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या कडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.आमच्या शाळा ही खाजगी असून आम्ही आमचे निर्णय घेऊ व ते पालकांना मान्य करावे लागेल.शाळेची फी ठरवण्याचे सर्व अधिकार हे शिक्षक पालक समितीला देण्यात आले आहेत. समिती संदर्भात पालकांनी शाळेला विचारणा केली असता.शाळेने याची उत्तरे दिली नाहीत.पालकांनी लेखी तक्रार देखील केली आहे.तक्रारीचे लेखी उत्तर देणे अपेक्षित असतांना अद्याप कोणतेही योग्य ते उत्तर शाळेने दिले नाही.प्रकारा मुळे पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकारा मुळे विद्द्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
शाळेचे चेअरमन व मुख्याध्यापक यांचे आडमुठेपणा मुळे विद्द्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित शिक्षण विभागाने चौकशी करणे गरजेचे आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा