Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १२ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
पी एम बायोटेक चा सेंद्रिय विषमुक्त शेती बद्दल सकारात्मक विचार करण्याची आधुनिक शेतकऱ्यांना काळाची गरज !
पी एम बायोटेक चा सेंद्रिय विषमुक्त शेती बद्दल सकारात्मक विचार करण्याची आधुनिक शेतकऱ्यांना काळाची गरज !
नमस्कार मित्रांनो मानविय आहारात लागणार अन्न उत्पादन शेतीतून होत असते !
आरोग्यदायक अन्ननिर्मितीसाठी माती व सेंद्रिय पीक उत्पादनाचा उपयोग होणे गरजेचे आहे. वर्तमानात शेती या क्षेत्रात रसायनांचा जोरदार वापर व त्याचा आरोग्यावर होणार परिणाम हा काही लपून राहिलेला नाही. गरज आहे आज सेंद्रिय शेतीकडे वळण्याची. आता सेंद्रिय शेती म्हंटली, की आपल्याला डोळ्यासमोर रासायनिक खते व रासायनिक कीटनाशके न वापरता केलेली शेती येईल. आता मुद्दा समजून घेऊ अति सेंद्रिय किंवा ‘अति रासायनिक’ शेती हे दोन्ही आपल्या साठी घातकच ठरेल.
त्यांचे कारण समजुन घेणे महत्त्वाचे आहे.जर आपल्या शेती शेजारी शेतकरी रासायनिक शेती करत असेल व आपन सेंद्रिय शेती ची वाटचाल असेल तर आपल्या सेंद्रिय शेती ला काही अर्थ नाही. त्या शेतकऱ्याच्या शेतातले हवेच्या वाटे येणारे केमिकल चे फवारणी व पाण्याच्या वाटे केमिकल युक्त खते हे वाहत आपल्या शेतात जर आले तर आपन खरंच सेंद्रिय शेती कशी करु शकतो.हे तर नैसर्गिक गोष्टी आहे.प्रथम आपल्याला निसर्गाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. हवा पाणी याला हे याला अपवाद नाही.
मित्रांनो काही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून सेंद्रिय शेती केली पाहिजे. सेंद्रिय शेती करतांना काही तत्त्वे आपण जोपासली पाहिजे. मुख्य म्हणजे निसर्गाप्रती प्रेम व आवड असणे आवश्यक आहे. निसर्गाने आपल्याला हे सर्व दिलेले आहे, म्हणून आपणही निसर्गाचं काही देणं लागतो ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजणे महत्त्वाचे आहे.
शेतीमधील आशादायक चित्र बघायचे असेल तर तरुणवर्ग शेतीकडे वळने महत्वाचं आहे. त्याच बरोबर शेती चे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून भविष्यात शेती साठी नवीन बदलांव स्वीकारणे गरजेचे आहे. तसेच शेतीपूरक व्यवसायातही गुंतवणूक करणे आवश्यक आहे ते व्यवसाय शेती घ्या संदर्भात असो किंवा नसो काही फरक पडत नाही.आपली व्यवसाय मधली आवक येणे आवश्यक आहे.
मंडळी क्षेत्र कोणतेही असो शेतीचे का असो त्या कामाची लाज वाटली नाहीपाहिजे. आपल्या क्षेत्रात मोठें होणे गरजेचे आहे आपल्या जगण्याचा मूलाधार असलेल्या शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास, आपल्याला प्रगतीच्या अनेक वाटा सापडतील, तेव्हा करिअरचे क्षेत्र निवडताना कृषी क्षेत्राचा प्राधान्याने विचार व्हायला हवं आहे.
शेती क्षेत्र हे संपत्ती आणि बुद्धी प्रदान करते. आणि शेती हा मानवी जीवनाचा आधार आहे. म्हणूनच जो विषय इतका प्राचीन, जुना आहे, शेती या विषयामध्ये भारतीय संस्कृती आणि भारतीय जीवन पद्धती यांनी संपूर्ण विश्वाला दिशा दाखवण्याचं काम केलं आहे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
प्रगत तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांच्या हातात आला पाहिजे, हे आपल्याकडे होत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आजच्या बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचणं आवश्यक आहे...... धन्यवाद मित्रांनो
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा