Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
इरकॉन सोमा टोल वे प्रा.लि.नवी दिल्ली या टोल कंपनी च्या अधिकाऱ्यांनीच केला खंडणीच्या झोल...
इरकॉन सोमा टोल वे प्रा.लि.नवी दिल्ली या टोल कंपनी च्या अधिकाऱ्यांनीच केला खंडणीच्या झोल...
धुळे प्रतिनिधी – राज्यात सुरू असलेल्या नॅशनल हायवे वरील टोल कंपन्यांच्या बाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी असतात व सदरच्या टोल कंपन्या या सेवा देण्याच्या नावाने वाहनधारकांची लूट करत असल्याबाबत व मनमानी कारभार करत असल्याबाबत अनेक वेळा तक्रारी देखील होतात मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
मात्र सदरच्या टोलच्या व्यवहारात कशाप्रकारे मोठे झोल करून आर्थिक व्यवहार होतात याच्या भांडा फोड सदरच्या घटनेतून झाला आहे.
इरकॉन सोमा टोल वे प्रा.लि.नवी दिल्ली चे संचालक श्री प्रदिप कटीयार यांच्या सांगण्यावरुन सदर कंपनीने अकाउन्टींग व फायनान्स अधिकारी हरिश सत्यवली यांनी तकारदार यांचेकडे स्वताः: करिता व प्रदिप कटीयार,संचालक यांचेकरिता एकूण ७,००,०००/- रु ची पंचांसमक्ष लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.
इरकॉन सोमा टोल वे प्रा लि.नवी दिल्ली या कंपनीने नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडीया यांचे कडुन दि.२८.०९.२००५ रोजी बांधा,चालवा व हस्तांतरीत करा या तत्वावर करारनामा केला आहे.सदर कंपनीने कोरल असोसिएटस (उदयपुर,राजस्थान) या कंपनीस दि.२२.०८.२०१२ रोजी नॅशनल हायवे क.३ (मुंबई-आग्रा) यावर असलेला चांदवड जि.नाशिक येथील टोल प्लाझा चे संपुर्ण व्यवस्थापन करण्याचा करारनामा केला आहे.सदर कंपनीने तक्रारदार याना दि.२५.०८.२०२२ रोजी मुखत्यार पत्राव्दारे टोल प्लाझा, चांदवड, जि. नाशिक ये संपुर्ण व्यवस्थापन व त्या सबंधी कागदोपत्राचे अधिकार प्रदान केले आहेत.
तक्रारदार यांनी कोअर असोसिएटस कंपनीने चांदवड टोल प्लाझाच्या व्यवस्थापना बददलचे डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ चे रिअॅम्बर्समेन्ट रक्कम अदा करण्यासाठी व
कोरल असोसिएटसने धुळे लळिंग टोल प्लाझा व्यवस्थापनाचा ठेका मिळण्यासाठी भरलेली निविदा मंजुर करण्यासाठी तकारदार यांचेकडे दि.१९.०२.२०२३ रोजी धुळे लळिंग इरकॉन सोमा टोल वे मुख्य कार्यालयात फायन्नस अधिकारी श्री.हरिष सत्यवली यानी स्वतः हा साठी २,००,०००/रु व इरकॉन सोमा टोल व प्राय.लि.नई दिल्ली चे संचालक श्री.प्रदिप कटीयार यांचेसाठी ५,००,०००/- ची मागणी केली होती. बाबत तक्रारदार यांनी आज दि.२१.०२,२०२३ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,धुळे कार्यालयात तक्रार दिली होती.
तकारदार यांनी दिलेल्या तकारीची आज रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान इरकॉन सोमा टोल से प्रा.लि.नवी दिल्ली या कंपनीचे संचालक प्रदिप कटीयार यांनी मोबाईल व्दारे सांगितले वरून सदर कंपनीचे फायन्नस अधिकारी हरिष सत्यवती यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वताः करिता २,००,०००/- रु व संचालक प्रदिप कटीवार यांच्याकरिता ५,००,०००/-रु असे एकुण ७,००,०००/- रु ची पंचासमक्ष मागणी करून सदर लाचेची रक्कम त्यांनी इरकॉन सोमा टोल वे प्रा.लि. कंपनीच्या धुळे लळिंग टोल प्लाझा जवळील मुख्य कार्यालयात स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून याचे विरुद्ध पोस्टे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री.अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री प्रकाश झोडगे,पोलीस निरीक्षक श्री. मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम,शरद काटके,संतोष पावरा,भुषण खलाणेकर,भूषण शेटे, गायत्री पाटील, रोहीणी पवार,रामदास बारेला सुधीर मोरे,जगदीश बडगुजर,प्रशांत बागुल, मकरंद पाटील यांनी केली आहे.
सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा.श्री शर्मिष्ठा वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक मा.श्री.नारायण न्याहाळदे व वाचक पोलीस उप अधीक्षक मा.श्री.नरेन्द्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा