Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
सटाणा ताहाराबाद रस्त्याच्या समस्येबाबत तरसाळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलनात सहभागी भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र उप प्रदेश अध्यक्ष बिंदू शेठ शर्मा याचा उपस्थितीत संपन्न....
सटाणा ताहाराबाद रस्त्याच्या समस्येबाबत तरसाळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलनात सहभागी भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र उप प्रदेश अध्यक्ष बिंदू शेठ शर्मा याचा उपस्थितीत संपन्न....
साक्री प्रतिनिधी:विंचुर प्रकाशा महामार्ग ७चे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करुन नविन रस्ता काँक्रिटीकरणाचे काम शासनाच्या वतीने चालु करण्यात आले आहे,परंतु काम घेतलेल्या ठेकेदाराकडून काम करतानां फार दिरंगाई केली जात आहे,ठेकेदाराला संबंधित विभागाचे अधिकारी पाठीशी घालत आहेत,गेल्या तिन वर्षापासुन काम चालु आहे.
परंतु अजूनही काम पूर्ण होत नाही,राष्ट्रीय महामार्गात रूपांतरण झाल्यानंतर सदर रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे.सध्या वनोली ते सटाणा दरम्यान सदर रस्त्याचे रुंदीकरण व कॉन्क्रेटीकरण करण्याचे काम चालु असुन काम अतिशय संथ गतीने सुरु आहे.तसेच मागील एक ते दिड महिन्यापासुन काम 100% बंद आहे,रस्ता ठिकठिकाणी खोदुन ठेवलेला असल्यामुळे रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर धुळीचे प्रमाण वाढलेले आहे.वाहनचालकांना समोरील वाहन दिसत नसल्यामुळे रोज छोटे मोठे अपघात होत असून यामुळे मोठी अपघाती दुर्घटना घडण्याची शक्यता आहे,तसेच दोन दिवसांपूर्वी औदांणे जवळ उसाचे ट्रक्टर रस्त्यावर पलटी झाले होते,रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेली खडी व दगड गोटे वाहनाच्या वेगामुळे त्या हवेत जम्प घेतात व रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोकांना दुखापती होत आहेत.तसेच धुळीमुळे वायू प्रदूषण,मानवी तसेच पशु पक्षी यांच्या आरोग्याच्या समस्या,व अपघात होण्याचे प्रमाण रस्त्यावर वाढलेले आहे.शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पिकांवर मोठ्याप्रमाणावर धुळीचा संचय होत असुन परिणामी पिकाच्या वाढीस बाधा निर्माण होत असुन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असुन आधिच संकटात असलेल्या शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे,“सदर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्था बाबतीत दि.२० जानेवारी रोजी तरसाळीचे माजी सरपंच लखन पवार वनोलीचे सरपंच शरद भामरे,औंदाणेचे सरपंच भरत पवार,साई सावली फाउंडेशन चे अध्यक्ष प्रशांत कोठावदे यांच्या नेतृत्वाखाली बागलाण उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या कार्यालयाकडे निवेदन देवून २६जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यांनतर एम एस आर डीसी विभागाचे अधिकारी यांनी रस्त्याची पाहणी करून नागरिकांची भेट घेतली व आंदोलन न करण्याची विनंती केली होती, परंतु प्रशासनास वेळ देवुनही आज पर्यंत रस्त्याचे काम चालु न झाल्याने आज गुरुवार दि.९रोजी संतप्त नागरिकांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर तरसाळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी मा.सरपंच लखन पवार, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा, प्रगतशिल शेतकरी सुधाकर पाटील,मा.सभापती वसंत भामरे आदीनी मनोगत व्यक्त करुन रस्त्याच्या समस्या मांडल्या व रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या होणार्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली, एम एस आर डीसी विभागाचे अधिकारी श्री डि.एस.पवार व श्री दिलिप वानखेडे यांनी आंदोलन स्थळी भेट देवून कार्यकारी अभियंता श्री पि.एस.आवटे यांचे आंदोलन कर्त्यांशी दुरध्वनीवर बोलणे करून देत १५दिवसात रस्त्याचे काम चालु करणे बाबत लेखी आश्वासन देवुन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केल्याणे १५ दिवसात काम चालु न झाल्यास एम एस आर डीसी विभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा देवुन आंदोलन स्थगित करण्यात आले,आंदोलन स्थळी सटाणा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, यावेळी वनोलीचे सरपंच शरद भामरे,औंदाणेचे सरपंच भरत पवार,साईसावली फाउंडेशन चे अध्यक्ष प्रशांत कोठावदे, बाजार समिती संचालक प्रभाकर रौंदळ,ग्रा.प.सदस्य दिपक रौंदळ,गणेश निकम,किशोर खैरनार,तंटामुक्ती अध्यक्ष राकेश रौंदळ,प्रहार चे तुषार खैरनार,संजय भामरे,प्रशात मोहन, राजेंद्र मोहन, उमेश रौंदळ, तुषार रौंदळ,गणेश रौंदळ,कोमल निकम, पुंडलिक रौंदळ,आदिसह परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या..
AVB माझा न्युज चॅनल सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा