Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २० फेब्रुवारी, २०२३

शिवजयंती निमित्त साक्री येथे.... आदर्श एकता सेवाभावी संस्थेच्यावतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.....



छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जयंती निमित्ताने आदर्श एकता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष श्री प्रकाश रामोळे सामाजिक कार्यकर्ता यांच्यावतीने आठ गरजू निराधार गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दप्तर, वया,पुस्तके,कंपास, पाणी बॉटल, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तके वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पद माननीय राजेंद्रजी टाटीया मा.उपनगर अध्यक्ष व प्रमुख अतिथी म्हणून नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. जयश्रीताई पगारिया व सामाजिक कार्यकर्ते विनोदजी पगारिया व संस्थेचे पदाधिकारी, हितचिंतक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मोहने सर यांनी केले व आभार संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश रामोळे यांनी मांडले.यावेळी संस्थेच्या स्तुभ्य उपक्रमा बाबत सर्वांकडून कौतुक करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध