Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्रीतील ऑर्किड इंग्लिश मीडियम शाळेत अवतरले शिवरायांच्या वेशभूषेत बालशिवाजी आणि माँ साहेब जिजाऊ
साक्रीतील ऑर्किड इंग्लिश मीडियम शाळेत अवतरले शिवरायांच्या वेशभूषेत बालशिवाजी आणि माँ साहेब जिजाऊ
साक्री तालुक्यातील ऑर्चिड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यात अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला
शाळेचा परिसर झाला होता भगवेमय …
विद्यार्थी श्रीवर्धन पवार बनला बालशिवाजी तर शिक्षिका कोमल पवार बनल्या माँ जिजाऊ महासाहेब…
साक्री आणि पेरेजपूर येथील ऑर्किड शाळेच्या शैक्षणिक संकुलात छत्रपती शिवाजी महाराज जयंती अभूतपूर्व उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली .
शिवजयंतीच्या निमित्तानं शाळा आणि महाविद्यालयांमध्ये रॅली ,अभिवादन कार्यक्रम ,सांस्कृतिक सोहळा याच आयोजन केलं जात.
विद्यार्थ्यांमध्ये असलेला उत्साह ओसंडून वाहतांना अनुभवास येतो ..
तसाच काही अनुभव या शाळेत काढलेल्या मिरवणुकीतून आला .शिवाजी महाराज आणि त्यांचे पैलू आजच्या शालेय विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष अनुभूतीतून साकारता यावेत या हेतून प्राचार्या योजना देसले यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली .
आणि चक्क बाल शिवाजीच्या भूमिकेत विद्यार्थी शाळेत अवतरले …ते सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले .
पाहू या अनोखा आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण …
अवतरले शिवरायांच्या वेशभूषेत बालशिवाजी आणि माँ जिजाऊ…
शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल ताशांचा गजर करीत शालेय परिसर दणाणून सोडला होता
विद्यार्थ्यांसह शिक्षक -शिक्षिका या मिरवणुकीत तल्लीन होऊन सहभागी झाल्याचं पाहावयास मिळालं .
यावेळी उपस्थीत संस्थेचे चेअरमन इंजी. मनोजकुमार भास्करराव देसले व संस्थेच्या सेक्रेटरी श्वेता मनोजकुमार देसले यांनी आयोजनाबद्दल मुख्याध्यापकांसह शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं कौतुक केलं.
तरूण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा