Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ५ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन…दुबईच्या रुग्णालयात अखेरचा श्वास…
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन…दुबईच्या रुग्णालयात अखेरचा श्वास…
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन झाले आहे. पाकिस्तानी मीडियाच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे. मुशर्रफ हे अनेक दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुशर्रफ अमायलोइडोसिस या आजाराने त्रस्त होते
परवेझ मुशर्रफ यांचा जन्म दिल्लीत झाला
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४३ रोजी दिल्लीतील दर्यागंज भागात झाला होता. 1947 मध्ये भारताच्या फाळणीच्या काही दिवस आधी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वडील पाकिस्तान सरकारमध्ये काम करत होते.
1998 मध्ये परवेज मुशर्रफ जनरल झाले
1998 मध्ये परवेझ मुशर्रफ जनरल बनले होते. त्यांनी भारताविरुद्ध कारगिलसारखे युद्ध करण्याचा कट रचला. पण भारताच्या शूर जवानांनी त्यांची प्रत्येक चाल हाणून पाडली. जनरल मुशर्रफ यांनी त्यांच्या ‘इन द लाइन ऑफ फायर – अ मेमोयर’ या चरित्रात कारगिल काबीज करण्याची शपथ घेतल्याचे लिहिले आहे. मात्र नवाझ शरीफ ते तसे करू शकले नाहीत.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा