Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ फेब्रुवारी, २०२३

शिरपूर शहरात एका २२ वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने निर्घृणपणे खून केल्याची घटना आली समोर



शिरपूर प्रतिनिधी – शिरपूर शहरात
एका २२ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आल्याने शहर हादरले आहे.

सविस्तर वृत्त: मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिंगावे शिवारातील बालाजी नगर भागात राहणारा २२ वर्षीय तरुण राहुल राजू भोई याचा धारदार तीक्ष्ण हत्याराने निर्घृणपणे खून केल्याची घटना दिनांक ०४ रोजी सायंकाळी ०७ वाजता समोर आले आहे.

जखमी अवस्थेत नातेवाईक यांनी तरुणास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले आहे.यावेळी नातेवाईकांकडून मोठा आक्रोश व्यक्त होत आहे.सदर घटनेचे वृत्त कळताच उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व शोध पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली.पुढील कारवाई पोलिसांकडून केली जात असून याबाबत तपास करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जात आहे.

या घटनेबाबत अधिकची माहिती तपासानंतर समोर येईल मात्र शहरात खुना सारखी गंभीर घटना झाल्याने भीती व आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध