Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
आयोध्यातील राम मंदिरात प्रभू रामचंद्राची मूर्ती साकारणार, खान्देशातील सुप्रसिद्ध धुळ्याचे राम सुतार हे घडविणार !
आयोध्यातील राम मंदिरात प्रभू रामचंद्राची मूर्ती साकारणार, खान्देशातील सुप्रसिद्ध धुळ्याचे राम सुतार हे घडविणार !
प्रभू श्री रामाचं आयुष्य जनकपुरी(नेपाळ), आयोध्या(उत्तरप्रदेश), जनस्थान(खान्देश) आणि श्रीलंका एवढ्या परिसरात गेलं. यातील 20% घटना आयोध्येत घडल्या 20% घटना श्रीलंकां आणि ईतर प्रदेशात घडल्या तर 60% घटना केवळ खान्देशात घडल्या आहेत. नर्मदा तापी ओलांडून दंडाकारण्य येताचं शबरीनी गोडं बोर दिली. ऋषी मुनींनी आश्रय दिला. पंचवटीत निवास दिला. तिथूनच सीता चोरी गेली. याच घटनेवर राम रावण युद्ध झालं. या युद्धाची सुरवात घुग्रराज जाटायुने यांनी केली, त्यात तो शहीद झाला तो पंचवटीचा राजा होता. राम हनुमान भेट याच मातीत अंजनी पर्वतावर झाली. सुग्रीव बरोबर तह इथेच झाला. इथूनच उड्डाणं घेऊन बजरंगबलीने श्रीलंकेतील सीतेचा शोध घेतला. ईथुनचं किष्किंधा नगरीच्या फौजानी लंकेकडे कुचं केलं. पुढचं रामायाण मग श्रीलंका आणि इतरत्र घडलं. पण उत्तर रामायाणात पुन्हा खान्देशात काही घटना घडल्या . लव कुश यांचा जन्म खान्देशातील आहें.
चाळीसगाव येथील नागझरी येथे वाल्मिक ऋषींच्या आश्रमात लवकुश जन्माला आले. तिथेच त्यांना वाल्मिक ऋषीनी शस्त्र, अस्त्र, शास्त्र आणि गायन, वादन, नर्तन यांचं शिक्षण दिलं. खुद्द रामायणकार वाल्मिक ऋषी यांचा जन्म याच वालझरी गावातील आहें. त्यांची वाटमारी इथलीच आहें. त्यांनी माणसं मारून खड्याचे जे सात रांजण भरले तें ठिकाण म्हणजे आजच रांजणगाव इथूनच बाजूला आहें. तिथे सात रांजन आजही अस्तित्व आहेत.
प्रभुराम चंद्राचा एवढा मोठा सहवास खान्देशच्या मातिला मिळाला आहें. आज आयोध्या नगरी राम मंदिरच्या रूपाने जगभरात चर्चेत असताना, तपोभूमी कशी अलिप्त राहील. तापी तें इगतपुरी हीं पूर्ण तपोभूमी आहे. जनकपुरी राम शिलांच्या माध्यमातून प्रकाशात आली. मंदिराती सर्वात पवित्र अंग म्हणजे मूर्ती. हीं मूर्ती नेपाळ येथील गंडकी नदीच्या पात्रातील पवित्र शालिग्राम दगडा पासून बनवायचे ठरले आहें. त्यासाठी 40 टन वाजनाच्या दोन शिला नेपाळ मधून आयोध्येत आणल्या आहेत. त्यातील एका शिलेतुन रामलल्लाची मूर्ती आणि दुसरीतून कोदंडधारी राम घडविला जाईल.
कोण घडवेल या मुर्त्या? कोण असेल तो कारगीर ?
तेंव्हा राम सुतार हे नावं पुढे आलं. तें राम सुतार घडविणार या जगप्रसिद्ध राम मंदिरातील मुर्त्या. हे तेच रामसुतार आहेत. ज्यांनी गुजराथ मधील जगातील सर्वांत उंच मूर्ती, सरदार वल्लभभाई पटेल स्टॅचू ऑफ युनिटी बनविला आहें. तें *पद्मभूषण राम सुतार. घडविणार आयोध्येतील मुर्त्या. हा महाराष्ट्र राज्याचा गौरव खान्देचा सन्मान आहें.
मा राम सुतार यांचा जन्म 1925 साली धूळे शहरांला लागून असलेले गोंदूर या खेडेगावात झाला. ज्या काळात खेड्यातील मुलं शाळेचं तोंड सुद्धा बघत नव्हतें, त्या काळात 1952 ला राम साहेब मुंबईच्या जे जे स्कुल ऑफ आर्ट कॉलेज मधून स्थापत्य शास्त्राची पदवी घेऊन बाहेर पडले. नंतर पुरातत्व विभागात त्यांनी नोकरी केली. त्यांच्याच आधीपत्याखाली, वेरूळ अजिंठा येथील मुर्त्या आणि लेण्यांची डागडुजी केली गेली. नंतर तें पुतळे बनऊ लागले. या कामांचा व्याप वाढत गेला म्हणून त्यांनी व्यवसाया निमित्ती दिल्लीला स्थलांतर केले. आज त्यांच्या कारखान्यात शंभरच्या वर कारगीर काम करतात. याच सर्वं नियोजन आता त्यांचा मोठा मुलगा करतो. पण सर्वं मार्गदर्शन मात्र राम सुतार यांचं असतं. त्यांनी देशभरात आणि देशा बाहेर अनेक पुतळे बनविले आहेत.
त्यांची काही प्रसिद्ध शिल्पे, स्टॅचू ऑफ युनिटी, सरदार पटेल, 45 फूट उंचीचे चम्बळ स्मारकां सोबतच महात्मा गांधीची प्रतिमा बनविली. त्यांच्या अनेक कॉपी देश आणि देशा बाहेर आहेत. संसद भवन दिल्लीच्या आवारात गांधीजींचा बैठ्या अवस्थेतील पुतळा, गांधीजी आणि बाबासाहेब यांचे अनेक पुतळे त्यांनी तयार केले आहेत. टोकीयो जापान येथील रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा, संसद भवनातीलच, मौलाना आझाद-18 फूट, इंदिरा गांधी-17 फूट, राजीव गांधी-12 फूट, गोविंद वल्लभ पंत-10 फूट, बाबू जगजीवनराम-9 फूट असे पुतळे तयार केले आहेत.
त्यांच्या कार्या बद्दल त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना 1999 मध्ये भारत सरकारचा पदमश्री आणि 2016 मध्ये त्यांना पद्म भूषण हे पुरस्कार मिळाले आहेत. ई स 2016 तील रवींद्रनाथ टागोर सांस्कृतिक सद्भावाचा पुरस्कार त्यांना 2018 मध्ये मिळाला आहें. आज जगातील सर्वात मोठा पुरस्कार मिळतं आहें. तों म्हणजे भव्य राम मंदिरातील राम लल्ला आणि पूर्ण आकृती सर्वं मुर्त्या बनवायचं काम महान शिल्पकार राम सुतार यांना मिळाल आहें. हीं मूर्ती आणि मंदिर यांना पुढच्या हजार वर्षात काही होणार नाही, एव्हडं हे सर्वं भक्कम आहें. तेवढी वर्ष राम सुतार हे नावं आबाधित आहें
राम सुतार यांना पद्म भूषण किताबत मिळाली आहें. भारतरत्न त्यापासून फक्त दोन पायऱ्या वर आहें. लवकर तें त्यांना मीळेल. आज त्यांचं वय 98 वर्ष आहें. प्रकृती ठणठणीत आहें. त्यांना शंभरी आणि भारत रत्न हे एकाच वेळी मिळोत हीं ईश्वर चरणी प्रार्थना. राम सुतार शिल्प कलेंतील तपस्वी आहेत. तपस्वी 200/200 वर्ष जगतात राम सुतार 150 वर्ष जगावेत हीं ईश्वर चरणी प्रार्थना.
हे सर्वं करून घेणारा राम आहे. रामाला अत्यंत बिकट परिस्थितीत खान्देशनी आश्रय दिला. त्या काळात या भूमिला दंडकांरण्य म्हणत. या तपोभूमीचे पुण्य लक्षात घेऊन जनक राजानी इथे येऊन अखंड पुण्य मिळविण्यासाठी यज्ञ केला होता म्हणून या पावन भूमिला त्या काळात जनस्थानहीं म्हणत असतं. अशा या आश्रदात्या पुण्यभूमीवर. रामाचे उदंड प्रेम होते. म्हणून रामानें हे स्वतः करून घेतलं. माझं मंदिर कोणीहीं उभारा पण माझी मूर्ती मात्र खान्देसी माणसानेचं तयार करावी हा हट्ट रामाचा होता. म्हणून रामानें रामाला खान्देशात जन्माला घातलं. त्यांना भराघोष आयुष्य दिलं आणि स्वतः रामानें रामा कडून रामाची मूर्ती करून घेतली.
AVB माझा न्युज चॅनल सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा