Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

ठाकरे गटाची धुळ्यात पोस्टरबाजी, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर कार्यकर्ते आक्रमक.....



धुळे - राज्याच्या विधिमंडळात आणि संसदेतील बहुमताच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून धुळे शहरात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ पोस्टर झळकवण्यात आले आहेत......
राज्यातील सत्तासंघर्षांनंतर गेल्या वर्षी जूनमध्ये ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी पक्षनाव व निवडणूक चिन्हावर दावा केला होता. त्यासाठी शिंदे गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर, आयोगाने हंगामी आदेश देत मूळ पक्षनाव व निवडणूक चिन्ह गोठवले होते. मात्र, केंद्रीय आयोगाने शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल दिला. ज्यामुळे उद्धव ठाकरे यांना शिवसेना गमवावी लागली....
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर कार्यकर्ते धुळ्यात आक्रमक होताना दिसून आले. जुने महानगरपालिका परिसरात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी झळकवत निवडणूक आयोग, व शिंदे गटासह मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.........

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध