Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाठलांचा मुलाची राजकारणात जोरदार एन्ट्री प्रतीक जयंत पाटील हे राजाराम बापू साखर कारखान्याचा निवडणुकीत विजयी
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाठलांचा मुलाची राजकारणात जोरदार एन्ट्री प्रतीक जयंत पाटील हे राजाराम बापू साखर कारखान्याचा निवडणुकीत विजयी
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा देखील राजकारणात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. जयंत पाटील यांचा मुलगा प्रतिक पाटील याने राजाराम बापू पाटील कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवडूण येत राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे. राजाराम बापू पाटील कारखान्याच्या संचालकपदी निवडूण येताच प्रतिक पाटील याची राजकारणात अधिकृत एन्ट्री झाल्याचे बोलले जात आहे.
स्वर्गीय लोकनेते राजारामबापू पाटील हे वाळवा सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेवेळी संचालक होते. राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर वाळवा सहकारी साखर कारखान्याचे नामांतर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना करण्यात आले. आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांचा राजकीय प्रवेश हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणुनच झाला होता. तब्बल १० वर्षे ते या साखर कारखान्याचे अध्यक्ष राहिले. आमदार जयंत पाटील यांनी नव्या पिढीला संधी देताना चिरंजीव प्रतिक पाटील यांचा राजकीय प्रवेश हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून केला आहे. अशी चर्चा आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
महेंद्र लोढा :- *सोशल मीडियावर मारवाडी जैन समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट तयार करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सागर मोर याच्यावर गुन्ह...
-
बापू चव्हाण दिंडोरी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने जागतिक सदस्य नोंदणी अभियानाचा आज मुंबई येथे अत्यंत उत्साहप...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा