Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

शेतकरी सहकारी संघ मालेगावच्या निवडणुकीस 6 महिन्याची स्थगिती’ तसेच संघाचे संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करून प्रशासक नियुक्तीची मागणी



मालेगांव -शेतकरी सहकारी संघ मर्यादित, मालेगाव, ता. मालेगाव जि.नाशिक या संस्थेची सन 2023 ते 2028 या कालावधीसाठीच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आलेला होता. त्यानुसार प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येऊन त्यावर आम्ही व्यक्तिगत सभासद व इतर सहकारी संस्था सभासद यांनी हरकती घेतल्या होत्या. तसेच दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासंदर्भात आम्ही हरकती घेऊन देखील आमचे नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट  करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आम्ही नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.श्री. दादासाहेब भुसे यांच्याकडे तक्रार केलेली होती. त्यानुसार मा. मंत्री महोदयांनी मा. मुख्यमंत्री महोदय व मा. सहकार मंत्री महोदय यांना पत्रव्यवहार केल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येऊन त्याची सत्यता तपासून शेतकरी सहकारी संघ मालेगाव यांच्या संचालक मंडळाने चुकीच्या पद्धतीने कामकाज करत व्यक्तिगत सभासद व सहकारी संस्था सभासद यांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने कामकाज केल्यामुळे व चुकीची मतदार यादी तयार केल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने वरील संदर्भीय आदेशान्वये शेतकरी सहकारी संघ मर्यादित मालेगाव, या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम सहा महिन्यासाठी स्थगित करून नव्याने मतदार याद्या सादर करण्याबाबत आदेश केलेला आहे. या आदेशान्वये नवीन मतदार यादी सादर करताना विद्यमान संचालक मंडळाकडून योग्य ते कायदेशीर कामकाज होण्याची शक्यता कमी असल्यामुळे व पुन्हा यामध्ये राजकीय हेतूने चुकीच्या पद्धतीने कामकाज होण्याची शक्यता असल्यामुळे तसेच विद्यमान संचालक मंडळाची सन 2020 मध्येच मुदत संपल्यामुळे यापुढे या संचालक मंडळाकडून कामकाज करून घेणे योग्य होणार नाही. असे आम्हाला वाटत असल्यामुळे यापुढील मतदार यादी व निवडणुकीचे कामकाज निपक्षपातीपणे व कायदेशीरपणे होणे आवश्यक असल्यामुळे शेतकरी सहकारी संघ मर्यादित मालेगाव, या संस्थेचे संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करून तेथे शासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करणेबाबतचे निवेदन मा.उपनिबंधक सहकारी संस्था, मालेगांव यांना देण्यात आले.
सदर निवडणुकीस स्थगिती मिळणेबाबत मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संघाचे व्यक्तिगत सभासद राजेंद्र (भटुदादा) जाधव, तसेच बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजयजी दुसाने, तालुकाप्रमुख मनोहर बापू बच्छाव, उपजिल्हाप्रमुख प्रमोद पाटील  व सुनिल देवरे, मालेगावचे माजी उपमहापौर निलेश आहेर, ज्येष्ठ पदाधिकारी केवळ आप्पा हिरे, ताराचंद बच्छाव, मधुकर देवरे इतर सहकारी संस्थांचे पदाधिकारी श्री सुनील पवार, सुरेश पवार, चंद्रकांत शेवाळे, संदीप शेवाळे, विनोद जाधव, राजेंद्र सोनवणे, केशव नाना पवार, प्रभाकर शेवाळे, जिभाऊ शेवाळे, राजेंद्र सोनवणे, शरद बच्छाव यांनी सदर मतदार यादींवर हरकत घेऊन सर्व सभासदांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. व त्या प्रयत्नांना या आदेशान्वये यश मिळालेले आहे. त्याचप्रमाणे वरील पदाधिकारी यांनी आज मा.उपनिबंधक, सहकारी संस्था, मालेगांव यांना संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नियुक्ती होणेबाबतचे निवेदन देण्यात आले.

AVB माझा न्युज चॅनल सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध