Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ५ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर येथील युवकांच्या खूनाच्या घटनेनंतर पोलीस स्टेशनवर धडकला आक्रोश मोर्चा....
शिरपूर येथील युवकांच्या खूनाच्या घटनेनंतर पोलीस स्टेशनवर धडकला आक्रोश मोर्चा....
शिरपूर प्रतिनिधी: शिरपूर येथील काल दि ४ रोजी सायंकाळी भोई समाजातील 22 वर्षीय युवकाचा झालेल्या खूनाच्या घटनेनंतर शिरपूर शहर पोलीस स्टेशनवर तालुक्यातील समस्त भोई समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे यावेळी मोर्चेकरींकडून सांगण्यात आले यावेळी मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला युवक व सर्व स्तरांतील लोकं उपस्थित होते.
शिरपूर शहरातील शिंगावे शिवारातील बालाजी नगर भागात राहणाऱ्या राजू भाई मच्छी वाला यांचा एकुतला एक मुलगा राहुल राजू भोई या २२ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना काल दि ४ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे.राहुल भोई याच्या शरीरावर धारदार शस्त्रानी निर्घृणपणे वार करून त्याचा खून करण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या भोई समाजाने व त्यांच्या मित्र मंडळी व नातेवाईक यांनी
प्रचंड समुदायने आरोपीला फाशी झाली पाहिजे आमाला न्याय मिळालाच पाहिजे अश्या घोषणा देत मोर्चा बालाजी नगर भोई गल्ली ते शिरपूर पोलीस स्टेशन पर्यंत पोलीस बंदोबस्तासह करण्यात आला त्यात भोई समाज व इतर समाजातील व्यक्ती देखील मोठ्या संख्येने समाविष्ट झाली होती त्यांनी देखील बंद करा बंद करा गुंडागर्दी बंद करा अशा घोषणा दिल्या मुळे पोलीस प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष ठेवून समस्त घटना शांततेने पार पडेल याकडे आपले लक्ष ठेवले होते.समस्त मोर्चेकरांच्या वतीने पोलीस निरीक्षक श्री आसाराम आगरकर यांना आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी व त्या पद्धतीने चौकशी व कारवाई करावी यासाठी निघालेल्या जन आक्रोश मोर्चा कडून निवेदन देण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा