Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
खूणाच्या गुन्ह्यातील आरोपीला फलटण येथून अटक.....!! धुळे पोलीस विभागाची अभूतपूर्व कामगिरीने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
खूणाच्या गुन्ह्यातील आरोपीला फलटण येथून अटक.....!! धुळे पोलीस विभागाची अभूतपूर्व कामगिरीने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
धुळे - धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेरे शिंदेवाडी येथे काही दिवसांपूर्वी मजुरीच्या पैशासाठी दारूच्या नशेत वाद घालून ट्रॅक्टरचा स्टेपलिंग रॉड आदर्श दत्तात्रय पिसाळ यांच्या डोक्यात घालून खूण करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी खून करून पसार झाला होता. या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले होते.
त्याच माध्यमातून स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आरोपी रोहित दादासाहेब जाधव वय 35 याला फलटण येथून ताब्यात घेतले असून त्याने सदरचा खुनाची कबुली दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी व मयत हे सातारा जिल्ह्यातून धुळे जिल्ह्यात ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची माती लेव्हलिंग चे काम करत होते. मात्र मजुरीच्या पैशातून वाद झाल्याने दारूच्या नशेत आरोपीने मयताच्या डोक्यात रॉड घालून खून केला होता.
गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बारा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, पोलीस उपाधीक्षक किशोर काळे , यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत , संजय पाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी आदींनी केली आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा