Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३

समाजहित जोपासणारा वर्दीतील संवेदनशील अधिकारी.श्री.सजंय बारकुंड साहेब.जिल्हा पोलिस प्रमुख सो.धुळे



जिल्हा पोलिस अधिक्षक आणि संवेदना .(माणूसकीच्या,कर्तव्याच्या ,जबाबदारीच्या,समाजहिताच्या आणि मिळालेल्या पदाला न्याय देण्याच्या)..पोलिस क्षेत्रात प्रत्येक अधिकारी ज्या ज्या जिल्ह्यात रुजू होतात त्यासाठीचा प्रत्येक अधिकाऱ्यांच्या कामाचा अजेंठा हा वेगवेगळा असतो..पोलिस हा पहिल्यांदा माणूस असतो ह्या वाक्यात सर्व काही आले..तुम्ही किती मोठ्या पदावर आहात आणि तेथपर्यत पोहचण्यासाठी केलेले प्रंचड कष्ट, त्यातूनच लोकशाहीतील व्यवस्था नावाच्या राजकीय परिस्थितीतला सामोरे जातांना आजच्या काळात संस्कार आणि संवेदना यापेक्षा मला मिळालेल्या अधिकारात माझ्या अजेंठावर काय अग्रक्रम असावा हे स्वातंत्र्य कोणीच हिरावू शकत नाही ..चिमणीच्या प्रकाशात फ्लॕश लाईट फिका पडतो का ?यापेक्षा माझ्या पुढे आणि माझ्या कार्यकाळात कोणत्या प्रश्नाला प्राध्यान्य असावे हे अधिकार वैयक्तिक असतात आणि त्याला प्रचंड नैतिक इच्छाशक्ती पण लागते ..असाच एक संवेदनशील अधिकारी धुळे जिल्ह्यात रुजू झाल्यापासून तरुणाई आणि त्यांचे भविष्य ..आजच्या पिढीसमोरील प्रश्न विशेषतः कन्या असणारे आई वडिलांना कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागते हा असंवेदनशील प्रश्न ज्या कडे कोणीच गांभीर्य पूर्वक पाहत नाही ...आजची परिस्थिती आणि असुरक्षीत मुली त्या पेक्षा त्यांचे कुटुंबीय यावर फारच चांगले काम आणि "पोलिस दादा" ही संकल्पना शालेय आणि महाविद्यालयांमध्ये राबवतांना धुळे एस्.पी. म.संजय बारकुंड साहेबांची कामाची आगळी वेगळी छाप पाहायला मिळते ..काम पहिले प्रसिद्धी मिळो या ना मिळो..परंतु मला मिळालेली संधी आणि माझ्या पदाचा उपयोग सद्य स्थितीतील भेडसावणार्या कोणत्या प्रश्नाला प्राध्यान्य दिले पाहिजे याचा प्राध्यान्यक्रम ठरवायचा आणि त्यातच मनापासून काम करायचे..हुद्दा आणि अधिकार शाही यापेक्षा मला दुसरे काहीतरी करायचे आहे यासाठी धडपडणारा हा अधिकारी ...मॕरेथान  स्पर्धा .. जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्रात यशस्वी झालेली स्पर्धा ..परंतु कुठेच एका यशाने थांबायचे नसते हा दृढ निश्चय ..काहीतरी चांगले  करण्याची स्पर्धा जेव्हा अंतरिक ऊर्जा निर्माण करते अशा कामाला तर  निसर्ग पण साथ देत असतो...परिक्षा केन्द्रांवर जाऊन समुपदेशन आणि विना तणाव सामोरे जाण्यासाठी वर्दीतील उच्च पदस्थ अधिकारी जेव्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो ,त्याचा परिणाम नक्कीच सकारात्मक असणार भयमुक्त वातावरणाची तोंडी जाहिरात पेक्षा ग्रांऊडवरील काम काहीतरी रिझल्ट देत असतो..दंगली पासून अवैध्य धंद्यात आणि महाभ्रष्टाचारांचा  जिल्हा म्हणून चित्रपट पर्यत पोहचलेल्या या जिल्ह्यात  एखादी सुरवात करतांना...फक्त एक वाक्य सध्याच्या एस्.पी.बंद्दल सांगता येईल ..मला शासन पगार आणि मिळणाऱ्या सुविधा देणारच आहे.तरीपण मला वाटत कोणी मला वेड्यात काढो.या ना. परंतु अखंड गढूळ पाण्याने वाहणाऱ्या समुद्राच्या किनारी तुरटी घेऊन फिरवतो आहे.पाणी किती शुध्द होईल माहिती नाही परंतु प्रयत्न माझे आहेत ते मी सुरूच ठेवणार.पोलिस क्षेत्रातील असे अधिकारी या जिल्ह्याला मिळणे एक सर्व सामान्य धुळे जिल्ह्यातील नागरिक या नात्याने आम्हास अभिमान आहे 🙏पंडित बेडसे सर व (सामाजिक कार्येकर्ता)पत्रकार चंद्रशेखर अहिरराव साक्री.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध