Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे अल्पवयीन मुलीचा गर्भपाता नंतर रक्तश्रावाने मृत्यू,पोलीस बंदोबस्तात काल रात्री उशिरा अंतिम संस्कार आरोपीला जेरबंद करण्यात पिंपळनेर पोलीस स्टेशनला यश
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे अल्पवयीन मुलीचा गर्भपाता नंतर रक्तश्रावाने मृत्यू,पोलीस बंदोबस्तात काल रात्री उशिरा अंतिम संस्कार आरोपीला जेरबंद करण्यात पिंपळनेर पोलीस स्टेशनला यश
पिंपळनेर येथील घोड्यामाळ परिसरात वडारवाडी येथे राहणाऱ्या पंधरा वर्षे तरुणी राजेश्री मंजुळकर या अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीरपणे गर्भपात केल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे पिंपळनेर येथे घोड्यामाळ परिसरात वडारवाडी येथे येथे ही वस्ती आहे या ठिकाणी राहणाऱ्या रेणूबाई रामदास मंजुळकर या महिलेने पिंपळनेर परिसरात फिर्याद दिली असता यात नमूद करण्यात आले आहे की ही सदर महिला आपल्या मुलीसह या वस्तीत राहत होती उदरनिर्वाहासाठी ही महिला बाहेरी कामाला गेली असता यात तिची अल्पवयीन मुलगी राजश्री मंजुळकर हिच्या वर याच परिसरात राहणाऱ्या राज दीपक सिकलकर याचा प्रेम संबंधातून या तरुणाने तिला लग्नाचे अमिष दाखवून तिची आई घरी नसल्याचा फायदा घेत वारंवार तिच्यावर अनैतिक कृत्य व अत्याचार केले दोन्ही समाजातील बदनामी होईल या भीतीने राज शिकलकर पिंपळनेर यांनी तिचा गर्भपात करण्याचे ठरवले त्यासाठी तिला रिक्षाने धुळ्याला आणण्यात आले एका खाजगी रुग्णालयात तिचा गर्भपात केल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने तिला बेशुद्ध अवस्थेत पुन्हा पिंपळनेर आत आणून घरात एकटी सोडून देण्यात आले ही बाब निदर्शनास आल्यानंतर जवळ असलेल्या कासूरकर यांनी व इतर नागरिकांच्या सहाय्याने एका खाजगी वाहनाने त्या मुलीला पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात येथे आणले या ठिकाणी राजश्री मंजुळकर या पीडित तरुणीला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाले आहेत यामुळे शहरात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे मृत तरूणीचे वय अवघे पंधरा वर्षे सहा महिने वीस दिवस आहे.
तिचा संशयस्पद मृत्यू झाल्याने प्रथम दर्शनी निदर्शनास आल्याने तिच्यावर धुळ्यात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले रात्री उशिरा तिच्या मृतदेहात पिंपळनेर आणून तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले या घटनेमुळे काहीसा तणाव निर्माण झाल्याचे बघून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला या घटनेचा संशयित आरोपी राज सिकलकर यांच्याविरुद्ध पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.न.65/2023 भा.द.वि.376(1)(N) सहलैंगिक अधिकारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम आहे पुढील तपास पोलीस उपअधीक्षक पिंपळनेर पी.पी.सोनवणे हे करीत आहे
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा