Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १५ मार्च, २०२३

भाजप किसान मोर्चा चे उप प्रदेशाध्यक्ष बिंदू शेठ शर्मा यांनी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी बाबत, धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात यावर चर्चा केली




धुळे जिल्ह्याचे लोकप्रिय नेते तथा धुळा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कार्यसम्राट पालकमंत्री गिरीशजी महाजन साहेब यांच्या मार्गदर्शन खाली व माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मध्ये धुळे जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या महत्वाचा मूलभूत गरजा होत्या त्यापैकी एक म्हणजे पिक विमा संदर्भात अडचणी पीक कर्ज बाबत सीबीलची अट रद्द करणे,तसेच नाफेडची शासकीय कांदा खरेदी करणे व साक्री तालुक्यातील नवीन सबस्टेशन मंजुरी करणे,अधिकच लोड असलेल्या ट्रान्सफर्मार वर अतिरिक्त ट्रान्सफर्मार बसविणे,राष्ट्रीयकृत बँकेचे सेटलमेंट, पंतप्रधान सन्मान योजनेचे पैसे मिळत नव्हते, दिघावे ते राष्ट्रीयकृत बँकेची शाखा ओपन करणे, तसेच धुळा मार्केट कमिटी मध्ये जे शेतकरी कांदा आणतात त्यांच्या कांद्याला योग्य मोबदला मिळावा म्हणून योगायोगाने मार्केट कमिटीला लाभलेले प्रशासन धुळे जिल्हा उपनिबंधक अभिजीत देशपांडे साहेब यांनी ट्रॉलीमध्ये कांदा भरून आणण्याची जी प्रथा पाडली धुळा मार्केट कमिटी मध्ये तिच्यामुळे शेतकऱ्यांचा गोण्या वाचणार भरायचा वेळ वाचणार आणि चांगला माल असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळणार आहे अशा अनेक मुख्य समस्या आहेत श्री बिंदू शेठ शर्मा यांनी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यामध्ये अनेक विषय भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा तसेच साक्री विधानसभा मंडळ अध्यक्ष इंजिनियर मोहन सूर्यवंशी तसेच प्रगतशील शेतकरी पप्पू खैरणार प्रवीण देसले विश्वास पवार उमेश नेरकर गोकुळ शेलार स्वामी मुळे व पत्रकार चंद्रशेखर अहिरराव प्रवीण काकुस्ते असे अनेक शेतकरी आज पालकमंत्र्यांच्या निर्णयामुळे समाधानी झाले आहेत माननीय जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आश्वासित केले की येणाऱ्या काही दिवसात आपण मांडलेल्या सर्व समस्यांचे निराकरण करून मार्ग काढून व शेतकरी संदर्भात मी नेहमीच काम करण्यास 24 तास तत्पर असतो असेही माननीय जिल्हाधिकारी यांनी चर्चेवेळी सांगितले साक्री तालुक्यासह जिल्हाभरात शेतकऱ्यांच्या छोट्या छोट्या अशा खूप समस्या आहेत आणि त्या आपल्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचल्या याबद्दल धुळे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून मी आपले शेतकऱ्यांचे हितचिंतक म्हणून स्वागत करतो असं माननीय धुळे जिल्हाधिकारी यानी कळविले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध