Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्साराम आगरकर व थाळनेरचे सहायक निरीक्षक उमेश बोरसे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान....
शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्साराम आगरकर व थाळनेरचे सहायक निरीक्षक उमेश बोरसे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान....
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तथा प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ए एस आगरकर आणि शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांनी अज्ञात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अतिशय वेगाने व यशस्वीपणे तपास करून आरोपींना जेरबंद केले. त्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे, धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या सन्मान करण्यात आला.
तालुक्यातील तरडी शिवारात अनोळखी युवकाच्या खुनाचा गुन्ह्यातील आरोपी उघडकीस आणत त्यांना जेरबंद करण्याची उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड त्यांच्या कामाची दखल घेत प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.
शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारातील मक्याच्या शेतात २४ फेब्रुवारीला अनोळखी युवकाचे दोन्ही हात ओढणीच्या साहाय्याने बांधलेल्या स्थितीत मृतदेह आढळला होता.
घटनेची माहिती मिळताच थाळनेरचे पोलीस ठाण्याचे एपीआय उमेश बोरसे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत वरिष्ठांना माहिती दिली.
माहिती मिळताच शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्साराम आगरकर व एलसीबीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
सदर घटनेत मयत झालेला इसम व मारेकरी हे दोन्ही अज्ञात असल्याने व कोणताही परिस्थितीजन्य पुरावा समोर नसल्याने तपास कार्यात अनेक प्रकारच्या अडचणी समोर होत्या.
घटनास्थळी मयताच्या खिशात असलेले एस.टी.चे तिकिट व्यतीरिक्त कोणताही पुरावा नव्हता.मात्र तपास अधिकाऱ्यांनी चोपडा ते गलंगी या अंतरावर प्रवास केलेल्या आरोपींच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत तपास कामास सुरुवात केली. तसेच मृतदेहाची परिस्थितीवरून त्याचा खून तीन ते चार दिवसांपूर्वी आणि ओढणीवरून प्रेमसंबंधातून खून झाल्याचा झाल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त करून अत्यंत सूक्ष्म तपास करीत मयताचे नाव निष्पन्न करीत आरोपीना होळनांथे व गुजरात राज्यातील पोरबंदर येथून जेरबंद केले.पोलीस दलाला आवाहन देणाऱ्या या किचकट खुनाच्या गुन्ह्याचा जलद गतीने तपास करीत उकल केल्याबद्दल पोलिस अधीक्षक संजय बारकुंड,अपर अधीक्षक किशोर काळे यांनी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्साराम आगरकर व थाळनेरचे सहायक निरीक्षक उमेश बोरसे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा