Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील राजकारणाचा महामेरू हरपला स्व.विलास आत्माराम बिरारीस यांचे दुःखद निधन
साक्री तालुक्यातील राजकारणाचा महामेरू हरपला स्व.विलास आत्माराम बिरारीस यांचे दुःखद निधन
साक्री तालुक्याच्या राजकीय पटलावरील मनमिळाऊ, सोज्वळ,अजातशत्रू तसेच दिलदार व्यक्तिमत्त्व,माजी जि.प.सदस्य, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन आबासाहेब विलासराव बिरारीस यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
साक्री तालुका शेतकरी संघाचे चेअरमन तथा माजी धुळे जिल्हा परिषद सदस्य आबासाहेब विलास आत्माराम बिरारी यांचे आज दिनांक 17 मार्च 2023 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आज संध्याकाळी 5.30 वाजता साक्री येथे अंत्यविधी होईल. अंत्ययात्रा शिवाजीनगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे. कैलासवासी आबासाहेब विलास बिरारीस साक्री तालुक्यातील बल्हाने येथील रहिवासी होते गावातील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदापासून राजकीय कार्य कीर्ती सुरुवात झाली सण 1997- 1998 यावर्षी त्यांनी कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पद भूषविले तेथून त्यांची खरी राजकीय कार्यकीर्ती सुरू झाली. 2001सालापासून तालुका शेतकरी संघाचे चेअरमन पद आजतागायत त्यांच्याकडेच आहे. 2013-14 यावर्षी पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य झाले. 2014 वर्षाला धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे सर्वात जास्त 7000 मत आघाडीने जि प सदस्य म्हणून निवडून आले . 2018 ते 2019 पर्यंत साक्री तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली . महाराष्ट्र राज्य पणन संघाचे संचालक पद देखील आबांनी भूषविले साक्री नव्हे तर धुळे नंदुरबार या जिल्ह्यात देखील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते साक्री तालुक्यात विशेषता पश्चिम पट्ट्यात आदिवासी भागात अतिशय मैत्रीपूर्ण सलोख्याचे संबंध होते आबा सर्वांच्या दुःख सुखात हजर राहत होते आबांचे दुःखद निधनाची बातमी ऐकल्यावर सर्व साक्री तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. आबासाहेबांच्या जाण्याने साखळी तालुक्यात एक मोठी राजकीय व सामाजिक पोकळी निर्माण होणार आहे. अशा या सच्चा मित्रास धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी व साक्री तालुका काँग्रेस कमिटी यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा