Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ मार्च, २०२३
चुकला तर ठोकला , ठोकला म्हणून सुधरला ! धुळे परिवहन विभागाची स्थिती....
शिरपूर प्रतिनिधी:-धुळे शासनाने घालुन दिलेल्या वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकांचे व वहान चालकाचे कर्तव्य आहे.मात्र असे असतांना काही बहाद्दर या वहातूक नियमांचे सर्रास उल्लंघन करता मग अश्या वहानांवर व चालकावर प्रादेशिक परिवहन विभागाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते.यात वहानाचे इन्श्युरन्स, पीयुसी,फ़िटनेस ही सर्व कागदपत्रे मुदतीत उपलब्ध करुन घेणे आवश्यक आहे.
याबाबत तरुन गर्जनाचे संपादक संतोष भोई यांना याबाबत एक प्रश्न निर्माण झाला. खरोखर सर्वसामान्य जनतेला जे नियम लागू आहेत.ते या परिवहन विभागाच्या अधिका-यांना व त्यांच्या वहानांना लागू आहे काय ? याबाबत त्यांनी तसा पत्रव्यवहार मागील वर्षी धुळे येथिल प्रादेशिक परिवहन विभागाला केला असता.वेळ मारुन नेण्यासाठी दिलेले उत्तर अतिशय गंमतीशिर होते.खरे पहाता आज त्या उत्तरावर आम्ही अक्षेप नोंदवू शकतो, अशी माहिती समोर आले आहे. कारण आज शुक्रवार दिनांक 17 मार्च रोजीच्या दैनिक लोकमत मध्ये आरटीऒच्या वाहनांची पीयूशी, इन्शुरन्स ऒके ! अशी बातमी प्रकाशित झालेली आहे.
यात लोकमत प्रतिनिधीस प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.एस.टी. अल्वारिस यांनी माहिती देतांना सांगितले की,सर्वांना सारखेच नियम आहेत.प्रादेशिक परिवहन विभाग असो अथवा शासनाचा कोणताही विभाग असो, सर्वांना नियम सारखेच असे त्यांनी सांगितले.मात्र त्यावेळेस आम्हास अधिनियम 148(1) प्रमाणे वहानांना सुट असल्याचे म्हटले आहे. मग जर शासनाचे सरकारी वहानांना विम्यात सूट आहे,तर मग आता त्या वहानांचे विमे का काढलीत ? नियमात सवलत असतांना वहानाचा विमा रक्कमेचा शासनास खर्च का ? असा प्रश्न निर्माण होते.शेवटी हा तरुन गर्जनाने दिलेल्या दणक्यामुळे आलेले शहानपण असेच म्हणावे लागेल.काही हरकत नाही,मात्र आतातरी कोठे जाग आली व सर्व वहानांची कागदपत्रे ओके केलेत. शेवटी वृत्तमिडियाचे कामच आहे की चुक शोधणे,ती दाखवणे,व त्यात दुरुस्ती करणे.यालाच म्हणतात. “चुकला तर ठोकला आणि ठोकला म्हणून सुधरला”अशीच काही धुळे परिवहन विभागाची गत आहे.
तसेच तरुन गर्जनाने अनाधिकृत वहान विक्री करणा-या शोरुम धारकांवर देखील काठोर कारवाई करुन जनहिताचे काम करावे.ज्यावेळीस चौकशी अधिकारी शिरपूर मध्ये आलेत. त्यावेळीस केवळ एकच अनाधिकृत वहान विक्री शोरुम त्या सापडले व इतर सर्व सर्व्हीस सेंटर आढळेत मात्र आज याच शोरुमांमध्ये भरगच्च वहाने विक्रीसाठी भरलेली असून ते ठेवण्यास जागा कमी पडत असल्याने काही वहाने शोरुम सोमरच्या मोकळ्या जागेत उभे केलेले आहेत.मग त्या दिवसी असे काय घडले की,शिरपूर शहरात केवळ एकच शोरुम व दोन वहाने सापडावित.म्हणजेच “दाल मे कूछ काला है ”तरी देखील झाले गेले गंगेला मिळाले.आता तरी जनहिताच्या दृष्टीने गुढीपाडव्यापुर्वी हा अथोराईज्ड सर्व्हिस सेंटरच्या नावाखाली अनाधिकृत वहान विक्री करण्या-या शोरुमवर कारवाई करावी व नवीन वर्षाची गुढी उभारावी.ही खरी जनेसाठी मराठी नवर्षाची दिलेली खरीखुरी भेट ठरेल.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा