Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १० मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
जळगाव जिल्ह्यातील दोन सरपंचांसह चार ग्रामपंचायत सदस्य अपात्र.... जातपडताळणी विभागाचे प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे स्पष्ट...
जळगाव जिल्ह्यातील दोन सरपंचांसह चार ग्रामपंचायत सदस्य अपात्र.... जातपडताळणी विभागाचे प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे स्पष्ट...
जळगाव प्रतिनिधी:- जळगाव जिल्ह्यातील दोन सरपंच व चार ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी यांनी निलंबित केले आहे,यात मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड ग्रामपंचायत आणि चाळीसगाव तालुक्यातील जुने पाणी ग्रामपंचायतीचे सरपंच आशा दोघांना अपात्र ठरविले आहे.तसेच अन्य ग्रा.पं.तील ४ सदस्यांवरही अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड येथील सरपंच पद ओबीसी संवर्गासाठी राखीव होते.या पदावर असणाऱ्या नयना श्रीधर पाटील यांनी पडताळणी केलेले जातप्रमाणपत्र सादर केले नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे शेषराव काशिनाथ पाटील व योगेश दयाराम कोळी यांनी ही तक्रार केली होती,नयना पाटील यांनी मध्यप्रदेश प्रशासनाकडून जात दाखल्यासाठी प्राप्त केलेले दाखले सादर केले होते.परंतु जातपडताळणी विभागाचे प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अपात्र ठरविले आहे.
तसेच चाळीसगाव तालुक्यातील जुनेपाणी पो.शिंदी येथील अवलीबाई धर्मा राठोड यांनी अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अपात्र ठरविले आहे.गोरख आप्पा राठोड या सदस्यालाही अपात्र ठरविले असून यासंदर्भात पंकज कैलास गरुड,ज्ञानेश्वर पिळोदे,नामदेव तिकोडे,दिलीप कोकणे,सरुबाई जाधव यांनी तक्रार केली होती.तसेच चाळीसगाव तालुक्यातीलच कुंझर ग्रा.पं.तील मनीषा संजय गढरी यांनी किरण ताराचंद मराठे, संगीता योगेश गढरी,सुमन मगनदास बैरागी,पूजा भूषण चौधरी यांच्याविरोधात तक्रार केली होती.सुमन बैरागी यांच्या मुलाने आणि पूजा चौधरी यांच्या सासऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाल्याने दोघांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा