Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १० मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील वासखेडी येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन, शेतकऱ्यांचा समस्या शेतकरी मित्र बिंदु शेठ शर्मा यांनी लावल्या मार्गी
साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील वासखेडी येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन, शेतकऱ्यांचा समस्या शेतकरी मित्र बिंदु शेठ शर्मा यांनी लावल्या मार्गी
काल दिनांक 09/03/2023. रोजी साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात वासखेडी येथे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व शेतकरी मित्र श्री.बिंदू शेठ शर्मा यांचा शेतकरी मेळावा पार पडला यावेळी साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील शेकडो शेतकरी या मेळाव्याला आवर्जून उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या विविध प्रकारचा अडीअडचणी सोडवण्याचे काम या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आले.त्यात शेतकऱ्यांचे मुख्य समस्या ही विजेची संदर्भात असल्यामुळे त्यावर थेट जिल्याचे मुख्य अभियंत्यांची संपर्क साधून शिवारातील व परिसरातील जाळीत ट्रान्सफर्मार त्वरित बसविण्यात यावेत यांवर श्री बिंदू शेठ शर्मा यांनी गावकऱ्यांच्या अडचणींचे समोरासमोर निराकरण केले.व प्रकरण निकाली काढले.हीच साहेबांची काम करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच विध्यमान ऊर्जामंत्री माननीय देवेंद्रजी फडवणीस साहेब व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात साक्री तालुक्यासाठी सहा सबस्टेशन मंजूर करण्याचं काम देखील अंतिम टप्प्यात आहे त्यात वासखेडी,धाडणे,उभरे,पिंपळनेर परिसरात तीन असे कामे मार्गी लागले आहेत हे काम बिंदू शेठ शर्मा यांच्या माध्यमातून त्यांनी पालक मंत्र्यांचा सहकार्याने करण्यात आले.शेतकऱ्यांच्या बँक ओ टी एस च्या समस्यांवर देखील चर्चा करून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम बिंदू शेठ शर्मा यांनी केले आहे त्यानंतर प्रधानमंत्री किसान योजनेच्या पैशांबद्दल होणारी अळी अडचण तसेच पाठ बागायतीचा प्रश्न चा शेतकऱ्यांच्या संदर्भात तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी व त्यातून होणाऱ्या शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता येऊ शकतो. या संदर्भात देखील शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांनी शेतकऱ्यांना खूप मोला चा सल्ला दिला राज्य शासनाच्या चार-पाचशे योजना आहेत याविषयी शेतकऱ्यांना माहिती देखील देण्यात आली. राज्याचा विविध क्षेत्रातील म्हणजेच कृषी, महसूल,जलसंधारण,फॉरेस्ट, बँकिंग,सार्वजनिक बांधकाम,
अशाच इतर खात्याचा विषयी शेतकऱ्यांना विविध माहिती मिळाली आहे राज्याचे पालक मंत्री श्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली साक्री तालुक्यात खूप जमेची बाजू आहे हे बिंदु शेठ यांची शेतकऱ्यांना पटवून दिले
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश उपअध्यक्ष शेतकरी मित्र बिंदु शेठ शर्मा तसेच साक्री तालुका भाजप अध्यक्ष सोनवणे साक्री तालुक्याचे भाजपचे भावी आमदार मोहन सूर्यवंश व त्यांचा पत्नी जि प सदस्य निलाबाई सुर्यवंशी रूनमळीचे सरपंच चंद्रकांत पवार तसेच अध्यात्मिक आघाडी चे मोरे वासखेडीचा सरपंच,उपसरपंच, ह.भ.प.भजनी मंडळ,गावकरी तरुण,वृद्ध,महिला,पत्रकार,आदींची उपस्थिती होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा