Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ९ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना : धुळे व मालेगांव लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी ८० कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना : धुळे व मालेगांव लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी ८० कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर
सटाणा - धुळे लोकसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेल्या १०५ किमी रस्त्यांच्या कामांना सुमारे ८० कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. अशी माहिती माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार संसदरत्न डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.
धुळे लोकसभा मतदार संघातील ग्रामीण भागात रस्त्यांची कामे होण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत धुळे लोकसभा मतदार संघातील धुळे ग्रामीण, शिंदखेड़ा, मालेगाव व बागलाण तालुक्यातील काही प्रमुख रस्त्यांच्या समावेश प्रधानमंत्री ग्रामसड़क योजनेत करण्यात आला. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत या रस्त्यांच्या कामाचा समावेश होण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंग, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने केंद्र शासनाने दि. १२ जानेवारी रोजी या रस्त्याच्या कामांना मंजुरी दिली.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा