Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर पुरवठा विभागाकडून रेशन दुकांनाची महिती मिळण्यास दिरंगाई ? रेशन दुकान धारकांवर शिरपूर तहसिल कार्यालयाचा वचक उरला नाही ?
शिरपूर पुरवठा विभागाकडून रेशन दुकांनाची महिती मिळण्यास दिरंगाई ? रेशन दुकान धारकांवर शिरपूर तहसिल कार्यालयाचा वचक उरला नाही ?
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुक्यातील दोन रेशन दुकांनाची माहिती माहिती अधिकारात आमच्या एका प्रतीनिधीने मागणी केलेली होती. सदर महिती ही जवळपास 7-8 महिन्यापुर्वी मागणी केलेली होती.त्या दुकांनदारकांकडून माहिती प्राप्त करुन घेणे व अर्जदारास ती पुरविणे ही जबाबदारी पुरवठा विभागाच्या जन माहिती अधिकारी यांची जबाबदारी असतांना,मागणी केलेली माहिती उपलब्ध करण्यासाठी वेळोवेळी त्या दुकांनदारांना अधिकृत पत्र काढून व वारंवार त्याच्या मोबाईलवरुन संपर्क करुन देखील हे आपल्याच धुंदीत मस्त झालेले मगरमच्छ अधिका-याच्या अधिकृत पत्राकडे व मोबाईलवरुन सुचना देऊनही जर कानाडोळा करत अस्तील तर मग यामागचे सत्य शोधणे गरजेचे आहे.असेच वाटते.
आमच्या प्रतिनिधीने प्राप्त केलेल्या माहिती नुसार दोन-तीन वर्षापुर्वी एका आदिवासी गावातील रेशन दुकानाबाबत तक्रार ग्रामस्थांनी व त्यागावचे खुद्द पोलिसपाटील व संरपंच यानी तहसिल कार्यालयाकडे केली होती.मात्र तरी देखील त्याच्यावर काहीच कार्यवाही होत नसल्याने त्या सर्व ग्रामस्थांनी माहिती अधिकार कार्यकर्त्या महासंघाच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधला व घडलेला सर्व प्रकार कथन केला.त्यात ग्रमस्थांनी सांगितले होते की, संबंधित दुकानदार सांगतो की,आम्ही खालपासून वरपर्यत हाप्ते देतो, त्यामुळे आमचे कोणीच.....करु शकत नाही.यावर माहिती अधिकार कार्यकर्त्या महासंघाच्या पदाधिकारी संजय नंदुरबारे यांनी अतिशय कडक शब्दात यावर ताशोरे ऒढत खुद्द तहसिलदार यांनाच पत्र लिहिले होते.व त्याच दिवशी सदर दुकानदारावर कार्यवाही करुन त्यांच्याकडून दुकान परवाना काढून घेतला होतात्यामुळे सदर पध्दत अजूनही सुरुच आहे की काय ? अशी शंका निर्माण होत आहे.त्यामुळेच तर हे दुकानदार खुद्द पुरवठा अधिकारी यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवून माहिती पुरविण्यास टाळाटाळ करत आहे.या दुकानदांच्याबाबतीत अजून कितीतरी प्रश्न ऐरणीवरच आहेत.त्याबाबत अजून कोणतीच वाच्चता व स्पष्टता करतांना दिसून येत नाही.आम्ही त्या सर्व प्रश्नांना एकामागून एक असे जनते समोर आणणार आहोतच. त्याबाबत वाच्चताही फ़ोडू व स्पष्टता करुन देऊ हे मात्र नकीच.
मागणी केलेल्या माहिती मिळण्यास इतका उशिर व दिरंगाई होऊन देखील माहिती मिळत नसेल तर मग यास पुरवठा विभागाचा हालगर्जीपणा समजायचा, का रेशन दुकानधारकांवर तहसिल कार्यालयातील अधिकारांचा वचक संपला असे समाजायचे ? अथवा मग वरिल प्रकार अजून सुरु आहे असे गृहीत धरायचे ? तेच सर्वसामान्य जनतेला अजून समजत नाही.म्हणून आता तरी आपल्या......चा लाक्षांक पुर्तीपेक्षा कर्तव्याकडे लक्ष देऊन अश्या बेजबाबदार रेशन दुकांनदारांवर कठोर कार्यवाही करावी. यातच खरे जनहित व जनसेवा आहे.असे सर्वसामान्य जनतेचे म्हणने आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा