Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १० मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
अरे बापरे हे काय धुळे न्यायालयात सुरू असलेल्या अंतिम युक्तीवादात विरोधी पक्षकाराच्या वकिलाची बोलती बंद करण्यासाठी चक्क जादूटोणा करण्याचा धक्कादायक प्रकार
अरे बापरे हे काय धुळे न्यायालयात सुरू असलेल्या अंतिम युक्तीवादात विरोधी पक्षकाराच्या वकिलाची बोलती बंद करण्यासाठी चक्क जादूटोणा करण्याचा धक्कादायक प्रकार
वकिलांने अंतिम सुनावणीच्या वेळेस आरोपी विरोधात जास्त बोलू नये किंवा त्याची बोलतीबंद व्हावी यासाठी जादूटोणा करण्याचा प्रकार उघडकीस
धुळे प्रतिनिधी :- धुळे न्यायालयात सुरू असलेल्या अंतिम युक्तीवादात विरोधी पक्षकाराच्या वकिलाची बोलती बंद करण्यासाठी चक्क जादूटोणा करण्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यात आज रोजी घडला आहे.धुळे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत तसेच न्यायालयाच्या परिसरामध्ये वकिलाचे फोटो काढून नाशिक येथील मौलाना याला व्हाट्सअप द्वारे पाठवून वकिलांने अंतिम सुनावणीच्या वेळेस आरोपी विरोधात जास्त बोलू नये किंवा त्याची बोलतीबंद व्हावी यासाठी जादूटोणा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ॲड.शामकांत रावजी पाटील यांच्या फिर्यादीवरून निसार शेख अमीर खाटीक याच्या विरोधात नरबळी आणि इतर अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा नुसार धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निसार शेख अमिर खाटीक विरुद्ध पंढरीनाथ भिला पाटील यांच्या विरोधात दिवाणी दावा क्र 219 / 2016 प्रमाणे धुळे येथील दिवाणी वरीष्ठ न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये चालु असल्याल्या सदर दाव्याच्या अंतिम युक्तीवादामध्ये पंढरीनाथ भीला पाटील यांचे वकील ॲड शामकांत पाटील यांनी जास्त बोलु नये किंवा त्यांची बोलती बंद करण्यासाठी न्यायालयाची इमारत व आवारामध्ये विना परवानगी पक्षकार पंढरीनाथ भिला पाटील आणि त्यांचे वकील शामकांत पाटील यांचे फोटो जादुटोणा करण्याच्या उद्देशाने नाशिक येथील एका मौलानाच्या मोबाईल व्हॉट्सअपवर पाठविले असल्याची बाब ॲड.शामकांत पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित संशयित आरोपी निसार शेख आमिर खाटीक याची चौकशी करून मोबाईलची तपासणी केल्यानंतर त्याने ही बाब उघडकीस आली.
ॲड शामकांत पाटील यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला असून यातील आरोपी निसार शेख समीर खाटीक राहणार देवपूर याला शहर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा