Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ५ एप्रिल, २०२३
Home
/
Unlabelled
/
नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तुफान दगडफेक
नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तुफान दगडफेक
नंदुरबार प्रतिनिधी :- शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तुफान दगडफेक झाली. समाजकंटकांनी दगडांसह काचेच्या बाटल्या फेकल्याने मोठे नुकसान झाले असून तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.या घटनेप्रकरणी पोलिसांनी २५ हून अधिक जणांना अटक केली आहे.
शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या महाराष्ट्र व्यायामशाळेजवळ मंगळवारी रात्री किरकोळ वादातून दोन गटात दगडफेक झाली.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील,अप्पर अधीक्षक नीलेश तांबे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.अश्रुधुराच्या कांड्या फोडत पोलिसांनी अर्ध्यातासात परिस्थिती नियंत्रणात आणली.
दगडफेकीत तीन ते चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.बुधवारी सकाळी १० पर्यत २५ जणांना अटक करुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी,शहर निरीक्षक रवींद्र कळमकर,निरीक्षक दीपक बुधवंत,स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार खेडकर, तालुका निरीक्षक राहुल पवार यांच्यासह पोलीस फौजफाटा आणि राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. दरम्यान,बुधवारी सकाळपासून परिसरातील सर्व व्यवहार सुरळीत झाले असून पोलिसांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दगड आणि काचा गोळा करत रस्ता मोकळा केला. उपद्रव प्रकरणी दोषींवर कडक कारवाईचे संकेत पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिले आहेत.पोलिसांची समाज माध्यमावरही नजर असून अफवा पसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही,असा इशारा दिला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा