Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १३ मे, २०२३
शिरपूर तालुका पोलीस स्टेशनची मोठी कारवाई....
शिरपूर (प्रतिनिधी) दिनांक १०/०५/२०२३ रोजी रात्री ००.०० वाजेचे सुमारास शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि.श्री सुरेश शिरसाठ यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की ट्रक क्रमांक के ए ०१ ए जे ००१५ क्रमांकाची ट्रक मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असणारी सुगंधीत तंबाखू भरुन इंदोर कडून धुळया कडे जात आहेत अशी बातमी मिळाल्याने स.पो.नि.सुरेश शिरसाठ यांनी पोलीस स्टाफला सदर बातमीची हकिगत सांगून स.पो.नि.श्री सुरेश शिरसाठ व शिरपूर तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस स्टाफ ने मुंबई आग्रा हायवे रोडवरील दहिवद गावजवळील छत्रपती हॉटेल समोर नाकाबंदी करुन रात्री ०१.०० वाजता संशयीत के ए ०१ ए जे ००१५ क्रमांकाची ट्रक हि येताना दिसली. सदर गाडी पोलीसांनी हात देवून थांबवली असता सदर वाहनातून चालकास खालील उतरवून त्यास सदर वाहना मध्ये काय माल भरला आहे असे विचारता तो समाधान कारक उत्तर देत नसलयाने सदर वाहन पोलीस स्टेशनचे आवारात आणण्यात आले.
तसेच त्यांनतर देखील दुसरे वाहनाबात गुप्त माहिती मिळाली की टाटा कंपनीचे ट्रक क्रमांक क्रमांक के ए ०१ ए जे २७७६ या वाहनात देखील महाराष्ट्रात प्रतिबंध असलेली तंबाखूची वाहतूक करुन इंदोर कडून धुळया कडे जात आहे अशी बातमी मिळाल्याने स.पो.नि. सुरेश शिरसाठ यांनी पोलीस स्टाफला सदर बातमीची हकिगत सांगून स.पो.नि. श्री सुरेश शिरसाठ व शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगवी च्या पोलीस स्टाफ ने हाडाखेड सिमा तपासणी नाका येथे नाका बंदी करुन पहाटे ०४.०० वाजता संशयीत के ए ०१ ए जे २७७६ क्रमांकाची ट्रक येताना दिसली सदर गाडी पोलीसांनी हात देवून थांबवली असता सदर वाहनातून चालकास खालील उतरवून त्यास सदर वाहना मध्ये काय माल भरला आहे असे विचारता तो समाधान कारक उत्तर देत नसलयाने सदर वाहन पोलीस स्टेशनचे आवारात आणण्यात आले. सदर वाहनाची पोलीस स्टेशनचे आवारता आणून तपासणी करता सदर दोन्ही वाहनात खालील प्रमाणे मुददेमाल मिळून आला. शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या धडक कारवाईत
मिळालेला माल- १) ३३.६०,०००/- रु. किं.ची रत्ना ३००० कंपनीची तंबाकू एकूण २८० बॉक्स एका बॉक्स मध्ये ८० छोटेबॉक्स प्रत्येकी किंमती१५०रुपये प्रमाणे.
२) १५,००,०००/- रु. किं.चा वाहन क्रमांक के ए ०१ ए जे ००१५ असा जु.वा. एकूण ४८,६०,०००/- रुपयाचा ट्रक सह मुददेमाल
२) पहाटे ०४.०० वाजता हाडाखेड सिमा तपासणी नाका येथे थांबवून वाहन पकडले. वाहन क्रमांक के ए ०१ ए जे २७७६ टाटा ट्रक चालक मंजू रोक्कडदम चन्नाप्पा वय ३३ वर्षे रा. चन्नाप्पा एन ए प्लॉट मदान भावी धारवाड कर्नाटक - ५८११०५ मोबा. नं. ६३६३९१७४९१ मिळाला माल-
१) १२००००० /- रु. किं.ची रत्ना ३००० कंपनीची तंबाकू एकूण १०० बॉक्स एका बॉक्स मध्ये ८० छोटे बॉक्स प्रत्येकी किंमती १५०/- रुपये प्रमाणे
२) ७,६४,४००/- रु. किं.ची प्रभात ३१० कंपनीची तंबाखू एकूण बॉक्स ६५ एका बॉक्स मध्ये १२ छोटे पत्रटी टिन प्रत्येक बॉक्सची किंमत ९८०/- रु. प्रमाणे
३) १५,००,०००/- रु. किं.चा वाहन क्रमांक के ए ०१ ए जे २७७६ असा जु.वा. एकूण ३४,६४,४००/- रुपयाचा ट्रक सह मुददेमाल
दोन्ही वाहनानसह एकूण ८३,२४,४००/- रु. कि.चा मुददेमाल जप्त करण्यात आले आहेत.. सदर प्रकरणी वाहन क्रमांक के ए ०१ ए जे ००१५ चालक किशोर राव एन नरेंद्रराव वय. ३१ रा. रेल्वे कम्पाऊन्ड मपाडी रोड बँगलोर नॉर्थ कर्नाटक व वाहन क्रमांक के ए ०१ ए जे २७७६ टाटा ट्रक चालक मंजू रोक्कडदम चन्नाप्पा वय ३३ वर्षे रा. चन्नाप्पा एन ए प्लॉट मदान भावी धारवाड कर्नाटक -५८११०५ यांना ताब्यात घेवून अन्न व औषध प्रशासन कार्यालय धुळे यांना लेखी पत्र देवून पुढील कायदेशीर कार्यवाई सुरु आहे.
सदरची कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री.संजय बारकुंड,अपर पोलीस अधिक्षक श्री.किशोर काळे, व शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्री अंसाराम आगरकर अति. कार्यभार उपविभागिय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग यांचे मार्गर्शनाखाली शिरपूर तालूका पोलीस स्टेशनचे स.पो.नि.श्री सुरेश शिरसाठ पो.स.ई.संदीप पाटील, पो.स.ई,.कृष्णा पाटील,पोहेकॉ संजय सुर्यवंशी, पोना संदीप ठाकरे,पोकों रोहीदास संतोष पावरा, चालक पोकों मनोज पाटील, चालक पोकों संतोष शिवाजी पाटील, चालक पोकों इसरार जकाउल्ला फारुकी,पोकों कृष्णा पावरा, पोकों मुकेश पावरा पोकों योगेश मोरे अश्यांनी सदर कारवाई केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा