Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १२ मे, २०२३
उंटावद शिरपूर रस्त्याची दुरावस्था...
उंटावद प्रतिनिधी :- उंटावद खर्दे बुद्रुक ,शिरपूर या पाच किलोमीटर रस्त्याची पार दयनीय अवस्था झाली आहे.
शिरपूर पासून जवळच मुंबई आग्रा महामार्ग वर टोलनाका असल्याने टोल चुकून जाणाऱ्या असंख्य वाहनांची वर्दळ या रस्त्याने रात्रंदिवस सुरूच असते शिरपूर उंटावद सावळदे हा रस्ता वाहनधारकांना फायदेशीर ठरत असल्याने अवजड वाहन देखील याच रस्त्याने मार्गक्रमण करत असतात अपघातांची संख्या लक्षात घेता माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने हा रस्ता अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता मात्र अवजड वाहनांना बंदी असलेला बोर्ड अरुणावती नदी जवळ या अगोदर लावलेला होता मात्र तो तो देखील गायब झाला आहे शिरपूर मुंबई पुणे धुळे शिंदखेडा आदी महामंडळाच्या बसेस देखील याच मार्गाने जात असतात तसेच खाजगी ट्रॅव्हल्स व चार चाकी वाहन देखील या रस्त्याने जात असतात उंटावद येथील गायत्री मंदिरासमोर भले मोठे खड्डे पडले आहेत या रस्त्यावर पायी चालणे देखील कठीण झाले आहे तसेच खदै बुद्रुक येथील दत्त मंदिरा समोरील रस्ता खड्डेमय झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती केली जाते मात्र बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने किरकोळ अपघातांची मालिका सुरूच आहे.या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना आपली वाहन नादुरुस्त होत आहेत खड्डे टाळण्याच्या नादात अपघात देखील होत आहेत या खड्ड्यांच्या त्रासामुळे अनेकांना कंबरदुखीच्या व मानपाठ दुःखी च्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे तसेच खड्ड्यांमुळे उडणारा धूर हा उंटावद खदै रस्त्यावरील नागरिकांच्या आरोग्याला अपायकारक ठरत आहेत. खड्ड्यांमुळे उडणाऱ्या धुरामुळे लहान बालके गरोदर माता व दम्याच्या त्रास असणाऱ्या नागरिकांना श्वसनाच्या त्रास देखील होत आहे.
खड्डे एवढे मोठे आहेत की आपले वाहनाला कोणता छोटा खड्डा आहे ? त्या खड्ड्यात टाकावे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागा विरुद्ध नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे तरी हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा व खड्डे मध्ये खडी व डांबर भरून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी व सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता व कर्मचारी यांनी रस्त्याची पाहणी करून त्वरित काम हाती घ्यावे व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय महाले व सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा