Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १४ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
मुंबई येथील एस.व्ही.के.एम.संस्थेच्या सी.एन.एम.स्कूल मध्ये 12 वी च्या आय.एस.सी.परीक्षेत 99 टक्के गुण प्राप्त करून अन्विता भारपिलानी प्रथम...
मुंबई येथील एस.व्ही.के.एम.संस्थेच्या सी.एन.एम.स्कूल मध्ये 12 वी च्या आय.एस.सी.परीक्षेत 99 टक्के गुण प्राप्त करून अन्विता भारपिलानी प्रथम...
शिरपूर प्रतिनिधी : मुंबई येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित सी.एन.एम.स्कूल व एन. डी.पारेख प्री-प्रायमरी स्कूल, विलेपार्ले मुंबईच्या विद्यार्थ्यांनी 12 वी च्या आय.एस.सी. 2022-2023 च्या परीक्षेत देखील घवघवीत यश संपादन केले असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
अन्विता भारपिलानी या विद्यार्थिनीने 99 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला.तसेच ह्रितिक कोतडिया 98 टक्के गुण द्वितीय क्रमांक,भावये कक्कड 96.75 टक्के गुण तृतीय क्रमांक, कयास मर्चंट 96.75 टक्के गुण तृतीय क्रमांक, सोहम लाड 95.75 टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक पटकावला.स्कूल मधील 58 पैकी सर्व 58 विद्यार्थी भरघोस गुणांनी उत्तीर्ण झाले असून 16 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. तर 24 विद्यार्थ्यांनी 80 ते 89 टक्के गुण प्राप्त केले आहेत. 7 विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत.
एस.व्ही.के.एम.संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांनी 14 मे 2023 रोजी दुपारी जाहिर झालेल्या निकालात 2022-2023 या शैक्षणिक वर्षात दैदिप्यमान यश संपादन केले असून महाराष्ट्रात व देशभरात गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आपले स्थान अधोरेखित केले. तसेच संस्थेच्या व स्कूलच्या प्रगतीत मानाचा तुरा रोवला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, सर्व ट्रस्टी, प्राचार्या कविता संघवी यांनी कौतुक केले.
सी.एन.एम. स्कूलमध्ये गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा निर्मितीसाठी खास प्रयत्न -
सी.एन.एम. स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल हे नियमितपणे पाठपुरावा करतात. 2003 पासून या स्कूलचा निकाल सातत्याने उल्लेखनीय राहिला असून अनेकदा येथील विद्यार्थी भारतात टॉपर ठरले आहेत.
--
With Thanks & Regards.....
Mr. Kishor Mali,
Publicity Dept. Shirpur,
Cell No ; 7588001662, 7020103114
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा