Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १८ मे, २०२३

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा – व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची मागणी....!



शिरपूर प्रतिनिधी :- देशभरातील पत्रकारांच्या हक्काच्या लढा लढणारी संघटना म्हणजे वाईस ऑफ मीडिया. सध्या संघटना विविध पातळीवर पत्रकारांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी व न्याय मागण्यासाठी लढा देत आहे.

पत्रकारांच्या बाबतीत नाशिक येथे झालेल्या घटनेची दखल घेत वाईस ऑफ मीडियाच्या राज्यप्रमुखांनी राज्यभरात निषेध व्यक्त करून निवेदन देण्याचा निर्धार केला.त्या अनुषंगाने आज शिरपूर तालुका व्हॉइस ऑफ मीडिया च्या माध्यमातून पत्रकारांकडून आज दिनांक 18 मे रोजी सकाळी 11 वाजता शिरपूर तालुका उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक शिरपूर यांना निवेदन सादर करून हल्ले खोरावर कारवाई करण्याबाबत विनंती करण्यात आली.

नाशिक येथे लावणी कलाकार गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे वृत्तांत करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर काही हल्ले खोरांनी हल्ला केला आहे.या घटनेच्या वाईस ऑफ मीडियाने तीव्र प्रमाणात निषेध व्यक्त केला असून वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर हल्ला होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून याबाबत प्रशासनाने योग्य ती पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.त्यामुळे पत्रकारांवर हल्ले होऊ नये व अशा घटना टाळता यावा त्यासाठी कठोर कारवाई करावी अशी मागणी च्या माध्यमातून पत्रकार बांधवांनी केली आहे. यावेळेस पत्रकार भिका चव्हाण ,महेंद्र माळी ,महेंद्र जाधव, ज्ञानेश्वर थोरात, राजू पाटील, लक्ष्मण गोपाळ, ईश्वर बोरसे गणेश जैन मोहसीन शेख इमरान शेख, शिवाजी थोरात, या सह वाईस ऑफ मीडियाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी व पत्रकार मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध