Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १८ मे, २०२३
पाचोऱ्यात बोगस खतांचा पर्दाफाश : कृषी खात्याची मोठी कारवाई....
पाचोरा प्रतिनिधी :-पाचोरा जारगाव शिवारातील गोडावूनमधून बोगस रासायनिक खतांच्या विक्रीचा कृषी खात्याच्या पथकाने पर्दाफाश केला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की,पाचोरा
शहरालगत असलेल्या जारगाव शिवारात एका व्यक्तींच्या गोडावून मधे गुजरात येथील मिल्सन फार्मास कंपनीने तयार केलेल्या बोगस रासायनिक खतांची विक्री गावोगावी जावून विक्री होत असल्याची माहिती जळगाव येथील कृषी विभागाचे नियंत्रक अरुण तायडे यांना गुप्त माहिती मिळाली होती.या अनुषंगाने पाचोरा येथील उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नयनवाड, पाचोरा पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम एस भालेराव, अरुण तायडे सह पाच जणांच्या पथकाने अचानक जारगाव येथील मधूकर शंकर भोकरे (वाणी) राहणार शिवाजी नगर पाचोरा यांचे
मालकीचे गोडावूनवर अचानक छापा टाकला
या छाप्यात सदरगोडावून मधे २० लाख १९ हजार रुपये किमतीचे ७टन बोगस रासायनिक खते आढळून आली. दरम्यान,गोडावून मालक मधूकर भोकरे हे फरार झाले असून त्यांनी हे गोदाम बिहार राज्यातील रहिवासी असणाऱ्या दोन युवकांना भाड्याने दिले असल्याचे समजते.हे दोन परप्रांतीय युवक शेतकऱ्यांना गावोगावी जावून बोगस खते विक्री करत असल्याचे कृषी अधिकारी एम.एस.भालेराव यांनी सांगितले.कारवाई पदकाने सात टन बोगस रासायनिक खते ताब्यात घेतले असून पाचोरा येथील पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.तसेच या कारवाईत बिहार येथील दोन युवक फरार असल्याचे भालेराव यांनी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा