Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ८ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
वास्तववादी विचार करायांचा आणि वस्तुस्थितीचा गांभिर्य पूर्वक विचार करायला लावणारे वास्तव कथानक असलेला चित्रपट ‘द केरला स्टोरी’
वास्तववादी विचार करायांचा आणि वस्तुस्थितीचा गांभिर्य पूर्वक विचार करायला लावणारे वास्तव कथानक असलेला चित्रपट ‘द केरला स्टोरी’
विचारांचा विचार करायला लावणारी कथा ‘द केरला स्टोरी’दुपारी ‘द केरला स्टोरी’ पाहायला गेलो, अजूनही त्याचा त्रास जात नाही. हा चित्रपट म्हणजे अनेक प्रश्न स्वत:लाच विचारायला लावणारा त्रासदायक छळवाद आहे.मुलींनी ज्या वयाच्या ज्या टप्प्यावर हा चित्रपट पाहिला पाहिजे,त्या वयात त्यांना तो पाहता येणार नाही, असे प्रमाणपत्र चित्रपटाला मिळाले आहे.
त्यापेक्षा जास्त किळसवाणी हिंसा व बीभत्स प्रणय मुले पाहून मोकळी झाली आहेत,हे बहुधा ओवळे टाकून सोवळे शोधणार्या सेन्सर बोर्डच्या गावी नसावे.चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे,हे फार कमी चित्रपट सिद्ध करतात. हा त्यापैकीच एक आहे. एरव्ही आपण पाहतोय तो चित्रपट आहे याची जाणीव प्रत्येक फ्रेममधून करून देणारे अनेक चित्रपट येतात आणि जातात.‘द केरळा स्टोरी’ पाहताना संपूर्ण चित्रपटभर मला स्वत:लाच सांगावे लागत होते की,‘हा चित्रपट आहे’.चार मुलींवर बेतलेली ही कथा,खरे तर चार विचारधारांचे प्रवाह आहेत.त्यातल्या दोन हिंदू आहेत,एक ख्रिश्चन आहे आणि एक मुस्लीम.हिंदूमधील एक साम्यवादी आहे. हिंदुत्व,साम्यवाद, ख्रिश्चनिटी आणि इस्लाम यांच्यावर लहान लहान गोष्टींमधून होणारे भाष्य फार महत्त्वाचे आहे.
जे संवाद आहेत, त्यापेक्षाही जिथे फक्त कॅमेरा सरकताना काही दृश्ये बोलतात ते ऐकणे, समजणे फार आवश्यक आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, नर्सिंग कॉलेजमध्ये शालिनी उन्निकृष्णन प्रवेश करते तेव्हा तिथल्या भिंतींवरून कॅमेरा सहज पुढे सरकतो. तिची थांबलेली नजरही कॅमेरा टिपतो.त्यानंतर काही वेळाने प्राध्यापिकेचे स्वागतपर भाषण आहे, त्यातल्या शब्दांचा खरा अर्थ सांगण्याचे काम भिंतीवरून फिरलेला कॅमेरा आधीच करतो. हे दिग्दर्शकाचे कौशल्य. सिरियात जाण्याआधी ज्या भागातून ती दोघे जातात, तिथे असलेले होर्डिंग खूप काही सांगून जातात.जेवायला गेल्यानंतर मुस्लीम मुलगी, ख्रिश्चन मुलगी,साम्यवादी मुलगी व हिंदू मुलगी याचे वागणे, बसणे,जेवणाआधी प्रार्थना करणे व त्यावरचा संवाद प्रत्येकीची लहानपणापासून तयार झालेली भूमिका सांगून जातो. नृत्य करायला तिघी जातात, मुस्लीम मुलगी तिथेच बसून राहते. साधे दृश्य आहे, पण खूप काही सांगून जाते.सांगण्यासारखे,छळवाद करण्यासारखे,स्वत:लाच प्रश्न विचारून घेण्यासारखे खूप काही आहे.
डोक्यातून एक गोष्ट काढून टाकून या चित्रपटाकडे पाहणे आवश्यक आहे. हा चित्रपट इस्लामविरोधी नाही,तर दहशतवादाविरोधात आहे.इस्लाम उलगडून सांगणारा आहे.जगभर एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या इस्लामी व साम्यवादी विचारधारा,भारतात मात्र हातात हात घालून एकमेकांची पाठराखण करत फिरतात, हे सांगणारा चित्रपट आहे.केवळ हिंदूंनीच नव्हे तर मुसलमानांनीही हा चित्रपट अवश्य पाहावा. संपूर्ण जग इस्लाममय झाले तर काय होईल, याचा अंदाज येईल.(‘लिप्स्टिक लावली तर हात कापण्याची शिक्षा इस्लाममध्ये हे भारतात कुणीच सांगितलं नाही’, हा संवादही खूप काही सांगून जातो.)सांस्कृतिक विस्तारवादाचे दहशतवादी स्वरूप लक्षात येईल. पंथाने आपण मुसलमान,ख्रिश्चन असलो तरी धर्माने हिंदू राहणे किती हितावह आहे, याचा अंदाज येईल.साम्यवादाच्या भारावलेपणातून बाहेर न पडलेल्यांना आपण काय गमावले आहे, याचा अंदाज येईल. आईबाप असलेली आताची पिढी आणि तरुण पिढी कुठे चुकत आहे, हे सांगणारा आहे.
अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत निखळत चाललेल्या कुटुंबातील आई या घटकाच्या वेदना सूक्ष्मपणे सांगणे मला हेलावून गेले. आजी,आई व नात यांचे संबंध,आपली मुलगी इस्लाम स्वीकारून निकाह करतेय हे कळाल्यावर,जावयासकट मुलीलाही स्वीकारण्याची तयारी दाखवणारी आई, मुलीला यायचेच नाही हे कळाल्यावर व्याकुळ झालेली आई,मुलीच्या न येण्याचे कारण कळाल्यावर हातातून मोबाइल गळून पडलेली आई, मुलीने संपर्क केला म्हणून तिला भेटायला डबा घेऊन जाणारी आई आणि शेवटी फोनवर मुलीला ‘आई झाल्यावर कसं वाटतं ? असं विचारणारी आई. हा एक सलग अनुबंध आहे,जो विस्कटून गेलेल्या कुटुंबाचे धागे सोडवत जातो.त्या आईचे दु:ख बहुधा मला आणखी अनेक दिवस छळत राहणार आहे.प्रत्येक आईने, प्रत्येक वडिलांनी हा चित्रपट पाहावा. हा केवळ चित्रपट नाही,हा विचार आहे जो प्रत्येकाने करावा.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा