Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ७ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
कापूस बियाणे विक्रीसाठी 15 मे पर्यत उपलब्ध करून द्यावे यासाठी धुळे जिल्हा सिड्स अँड पेस्टींसाईड असोसिएशनचे आमदार कुणाल पाटील यांना निवेदन
कापूस बियाणे विक्रीसाठी 15 मे पर्यत उपलब्ध करून द्यावे यासाठी धुळे जिल्हा सिड्स अँड पेस्टींसाईड असोसिएशनचे आमदार कुणाल पाटील यांना निवेदन
कापूस लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करून द्याव यासाठी निवेदन देण्यात आले
धुळे जिल्हा हा कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील शेतकऱ्यांचे कापूस हे मुख्य पीक आहे. त्यामुळे शेतकरी पूर्व हंगामी साधारण 15 ते 20 मे पासून कापसाची लागवड करीत असतो, म्हणून शासनाने शेतकऱ्यांना दि.15 मे 2023 पासून कापसाचे बी.टी बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी व सीड्स पेस्टिसाइडस, फर्टीलायझर डिलर्स असोसिएशनच्यामार्फत करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज धुळे जिल्हा सीड्स पेस्टिसाइड, फर्टीलायझर डीलर्स असोसिएशन धुळे आणि शेतकऱ्यांनी निवेदन दिले. म्हणून शेतकऱ्यांचे हित आणि मागणी लक्षात घेऊन बी.टी. कापूस बियाणे 15 मे 2023 दरम्यान उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी मी करीत आहे. या मागणीबाबत मा. मुख्यमंत्री आणि मा.कृषीमंत्री यांना पत्रही देण्यात आले आहे. 15 मे दरम्यान लागवड झालेल्या कापसाचे उत्पन्न वाढत असते. तसेच कापसावर कीड,अळी व रोगराईचा प्रादुर्भावही कमी असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून आर्थिक फायदा होत असतो.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा