Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री संजय बारकुंड साहेब यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न तरुण गर्जना वृत्त समूहाकडून साहेबांचे हार्दिक अभिनंदन
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री संजय बारकुंड साहेब यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न तरुण गर्जना वृत्त समूहाकडून साहेबांचे हार्दिक अभिनंदन
धुळे जिल्हा पोलिस प्रमुख मा.श्री.सजंय बारकुंड साहेबांचा आज जन्मदिवस धुळे जिल्हातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे म्हणजे काटेरी मुकूट.विविध चांगल्या आणि वाईट गोष्टींसाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षभरापूर्वी पोलिस प्रमुख पदाची सूत्रे साभांळताना बारकुंड साहेबांच्या कामाचे मूल्यमापन नक्कीच नोंद घेण्यासारखे ठरले.शिस्तप्रिय,कर्तव्य कठोर ,नेहमीच नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून जनता आणि पोलिस यांचा समन्वय साधतांना, सामान्य माणसाला पण न्याय मिळालाच पाहिजे.परंतु कोणावर अन्याय होता कामा नये, ही भूमिका पण कायम ठेवली पोलिसांमधला भला माणूस अनुभवल्याशिवाय कळत नाही .उच्च पदावरचा माणूस हा नम्र आणि सयंमी असला पाहिजे ह्याचा अनुभव जिल्ह्यातील जनतेला अनेक वेळा पाहावयास मिळाला.बारकुंड साहेबांची वर्षभराची कार्य किर्द अनेक घटनांची नोंद ठरावी अशीच म्हणावी लागेल .मी आणि माझे काम ,माझ्यावर असलेली जबाबदारीचे भान यासाठी नेहमीच धडपडणारा अधिकारी म्हणून धुळे जिल्ह्यातील यशस्वी आणि निपक्ष काम करणाऱ्या अधिकार्याच्या यादीत आपल्या कामगीरीची सदैव चर्चा होत राहील .कामचुकार,चमोगीरी आणि टेबल न्यूजचा आधार घेऊन गोडबोले अधिकार्यांची या जिल्ह्यात अजिबात कमी नाही, अशांना ओळखून प्रमुख पदावर काम करणे म्हणजे तारेवरची कसरतच म्हणावी लागेल .परंतु प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकार्यांचे कौतुक आणि पाठीवर शाबासकीची थाप तसेच कामचुकारांना वठणीवर आणण्याचे काम करतांना,अनेक दुरस्त्या अजून बाकी राहिल्याही असतील, तरी सुध्दा आपल्या निपक्ष कार्याची झलक वर्षभरात जिल्हा वासियांना नक्कीच पाहायला मिळाली आहे जिल्ह्यातील प्रमुख पदावर काम करणे आणि शिस्त लावणे म्हणजे उजाड गावात मारुतीचे मंदिर असल्या सारखेच.सुरवात A पासून असली तरी अवैध्य धंद्याचा बालेकिल्ल्यात गढूळ पाण्याने वाहणाऱ्या नदीच्या किनारी कायद्याची तुरटी घेऊन पाणी शुध्द करण्याचा अर्थातच शिस्त लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या कडून सुरूच आहे .आपल्या प्रयत्नाला नक्कीच आमचा सलाम आहे .जिल्ह्यातील आपली कारकिर्द यशस्वी आणि नोंद घेणारी ठरो..आपल्या हातून चांगले आणि अति चांगले घडो ..हीच आपल्या जन्मदिना बद्दल शुभेच्छ्या व्यक्त करतांना दिर्घायुष्याच्या पण प्रार्थना ..लेखन- पंडितराव बेडसे सर (पत्रकार)
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रा.महेंद्र तुळशिराम खेडकर: कला, शिक्षण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम. कला आणि संस्कृतीच्या प्रांगणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा