Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
पी.एम.बायोटेक चे नैसर्गिक व सेंद्रिय शेतीच्या निरीक्षणातील एक महत्त्वपूर्ण निरीक्षण समोर आले आहे, महाराष्ट्रतील शेतकऱ्यांसाठी रोटवेठर शाप की वरदान ठरत आहे
पी.एम.बायोटेक चे नैसर्गिक व सेंद्रिय शेतीच्या निरीक्षणातील एक महत्त्वपूर्ण निरीक्षण समोर आले आहे, महाराष्ट्रतील शेतकऱ्यांसाठी रोटवेठर शाप की वरदान ठरत आहे
महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंनो रोटॅव्हेटरचा वापरून आपलेच पायावर धोंडा मारून घेवू नका.डॉ टी.डी.पाटील डॉ.रितू ठाकरे
रोटॅव्हेटर मशीन शेतकर्यांना एक
शेतीसाठी वरदान वाटायला लागले आहे, मात्र पी.एम.बायोटेकने सेंद्रिय शेतीचा हाती घेतलेल्या उपक्रमात एक नवीन निरीक्षण समोर आले आहे रोटावेटर वापरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते की फायदा या मशीनचा वापर प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात फायदे वा नुकसान न समजता करीत आहे.या मशिन चा वापर केल्यानंतर लगेच पावसाळी पेरणी करतो. अश्या शेताचा आपण चांगला अभ्यास केला तर असे लक्षात येते की ही मशीन फक्त 4 ते 5 इंच माती कोरली जाते व ती मशीनच्या पञाच्या आवरणाखाली 2000 आर पी एम या गतीने मशीनचे पाते फिरत असतात व मातीचे रुपांतर बारीक तोंडावर लावायची पावडर प्रमाणे तयार होते.याउलट गतीमान यंञाने 5 इंचाखालील जमीन (मशागत झालेल्या क्षेञाखालील) इतकी टणक बनते.अश्या मशागत झालेल्या जमीनीत जोरदार पाऊस पडल्यास मातीचा थापडा बनतो व पावसाचे पाणी जमीनीत न मुरता उताराच्या दिशेने शेताच्या बांधाजवळ जमा होते नंतर बांध फोडून सुपीक माती पाण्यासोबत वाहून जाते. यदाकदाचित शेतात पाणी थांबले असेल तर त्यातील थोडेसे पाणी जिरते नंतर छिद्र जिरणारया पाण्यासोबतच्या बारीक मातीच्या कणांमुळे बंद होतात. वरील प्रक्रीयेमुळे शेतकरी अप्रत्यक्षरित्या समुद्र बुजायला मदत करतो.
याउलट नांगरणी केल्यास पावसाचे पाणी शेतात थांबते व जमीनीत खोलवर मुरते.
यामुळे पिकाला चांगले पाणी पुरवले जाते व उत्पादन चांगले मिळते,तसेच विहीरींची पाण्याची पातळी चांगली राहते.
जर कायम रोटॅव्हेटरचा वापर करीत राहीलो तर विहीरीच्या पाण्याची पातळी खोल जात राहील आणि कालांतराने विहीरी कोरडया पडतील व पिकांना पाणी पुरेसे मिळणार नाही त्यामुळे उत्पादनात घट येईल.
कृषी महाविद्यालय धुळे येथे पदव्युत्तर (कृषी) च्या विद्याथ्याला प्रयोग दिला होता त्यात एकदा, दोनदा, तीनदा रोटॅव्हेटर केले, एकदाच नांगरणी, एकदाच कल्टीव्हेटर अश्या पाच प्रक्रियांचे पाच पट़टे शेतात करून त्यात पावसाळयात बाजरीचे पीक पेरले होते त्यात असे आढळून आले की, रोटॅव्हेटरच्या पटृयातील बाजरीची वाढ कमी झाली तसेच कणसे लहान आढळून आली तसेच मुळयांची लांबी कमी दिसून आली. पर्यायाने उत्पादन कमी आले.
याउलट नांगरणी केलेल्या क्षेञात जास्तीचे उत्पादन आले.यावरून असे आढळून आले की पावसाचे पाणी नांगरणीमुळे पाणी खोलवर जाऊन जमिनीत जिरले त्यामुळे मुळ्या वाढल्या व उत्पादन चांगले आले. यानंतर कल्टीवेटर केलेल्या शेतात नांगरणी पेक्षा कमी उत्पादन आले की यावरून असे आढळून आले की रोटावेटर केलेल्या शेतापेक्षा कल्टीवेटर केलेल्या शेतात जास्त उत्पादन आले रोटावेटर केल्याचे तोटे जमिनीत मातीचा फफुटा झाल्यामुळे पाणी मुरत नाही यामुळे पिकांना पाण्याचा ताण लवकर जाणवतो जमिनीत पाणी न मुरल्यामुळे पाणी शेतातून वाहून जाते असे पाणी वाहून जाताना शेतातून टनाने माती पाण्याबरोबर वाहून नाल्यात जाते नाल्यातून नदीत जाते नदीतून समुद्रात जाते अशा प्रकारे समुद्र बुजवायला रोटावेटर करणारा शेतकरी मदत करतो जमिनीत पाणी मुरत नाही यामुळे विहिरी ट्यूबवेल कोरड्या पडतील पर्यायाने पिण्यास पाणी मिळणार नाही टँकरची व्यवस्था करावी लागेल धरणात गाळ साचून पाणी साठा व पाणी झिरपणे बंद होईल म्हणून शेतकरी बंधूंनो भविष्यात रोटावेटर करून आपल्याच पायावर धोंडा मारू नका यापुठे रोटावेटर करणे पिकासाठी व पिकाच्या उत्पन्नासाठी फायदेशीर नसून नुकसानदायक आहे हे सत्य समोर आले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा