Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ७ जून, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळे अंगणवाडी भरतीत घोळ व भ्रष्टाचार.! एजंटच्या माध्यमातून 70 हजाराची बोली व सिलेक्शन,पात्र यादीतील विधवा व अन्य महिलांचा आरोप.
धुळे अंगणवाडी भरतीत घोळ व भ्रष्टाचार.! एजंटच्या माध्यमातून 70 हजाराची बोली व सिलेक्शन,पात्र यादीतील विधवा व अन्य महिलांचा आरोप.
धुळे महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत झालेल्या अंगणवाडीच्या भरतीत घोळ व भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप पात्र लाभार्थ्यांसह उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.एजंटच्या माध्यमातून 70 ते 80 हजार रुपयाची बोली लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पात्र यादीमधील मधील ज्या महिलांनी पैसे दिले असतील त्यांचेच या भरतीत सिलेक्शन झाला असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तर या भरतीची सखोल अशी चौकशी करावी अन्यथा पेट्रोल टाकून कार्यालयात आत्मदहन करणार असल्याचा इशाराही एका तरुणाने दिला आहे..
धुळे महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत झालेल्या अंगणवाडीच्या भरतीत मोठ्या प्रमाणात घोळ व भ्रष्टाचार झाला असल्याचा दिसून आले आहे..
अंगणवाडी सेविकेच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता न ठेवल्याचा आरोप अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज केलेल्या महिला उमेदवाराने केला आहे. दरम्यान शासनाच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन न करण्यात येऊन शैक्षणिक अर्हता,गुणवत्ता, वय बोलीभाषा इ. निकष डावलून बालविकास प्रकल्प अधिकारी व समितीतील सदस्यांनी व्यक्तिगत फायद्यासाठी पडद्याआडून एजंटच्या माध्यमातून 70 ते 80 हजार रुपयाची बोली करत आर्थिक व्यवहारा पोटी काही पात्र यादीतील मोजक्याच महिलांचे सिलेक्शन करत ही भरती पार पडली आहे.
वास्तविक या भरती संदर्भात अनेकांनी हरकत घेतली आहे त्या हरकतीवर समाधानकारक उत्तर न देता केवळ आर्थिक व्यवहारापोटी काहींना ऑर्डर देण्यात आली आहे तर गुणवत्ता डावलून आमच्यावर अन्याय केला असल्याचा आरोप ही याठिकाणी करण्यात आला आहे...... वरिष्ठांच्या माहितीनुसार पात्र यादीवर आम्ही स्वाक्षरी केली असल्याची महिला व बाल विकास विभागातील कर्मचारी महिलांनी दिली आहे. त्यामुळे ही भरती डोळे झाकपणाने होत असल्याचे निदर्शनास आल आहे.अनुसूचित जाती/
जमाती/भटया जमाती प्रवर्गातील उमेदवारांना गुणदान देण्यात आलेले आहे,पारदर्शकतेला निवडीमध्ये सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. मात्र या ठिकाणी नियमांचे उल्लंघन केलं गेलं असल्याचा आरोप करण्यात आला.तर भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी पदासाठी अर्ज केलेल्या महिला उमेदवारांसह उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख हेमालता हेमाडे,शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील, यांसह आधी यावेळी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा