Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ९ जून, २०२३

शिरपूर शहर पो.स्टे.ची मोठी कामगिरी खुनाच्या गुन्हयात ०३ आरोपीना जन्मठेप व ५,०००/-रुपये दंडाची शिक्षा



शिरपूर प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील जुने भामपुर येथील दि.१२/०७/२०२० रोजी दुपारी ४.०० वाजेचे सुमारास जुने भामपुर ता.शिरपुर जि.धुळे गावात विजय बन्सी भिल वय ३० रा.जुने भामपुर ता.शिरपुर जि.धुळे याचे त्याची पत्नी कविता विजय भिल हिचे सोबत घरगुती कारणावरुन भांडण झाले त्यावरुन कविता विजय भिल हिने तिचे वडील- ओंकार शंकर ठाकरे, भाऊ- अंबालाल ओंकार ठाकरे व ज्ञानेश्वर ओंकार टाकरे सर्व रा. जावदा ता.शहादा जि.नंदुरबार यांना फोन करून कळविले असता त्यांनी जुने भामपुर गावात येवून जावई विजय भिल यास तु आमने पोरले फासी लावस का तु मरणा तरी चालो आम्ही जेल भोगी लेसुत असे बोलत शिवीगाळ करीत त्याचे छातीवर हाताबुक्क्यांनी मारुन ज्ञानेश्वर ठाकरे याने त्याचा हात पकडुन अंबालाल ठाकरे याने त्याचा गळा दाबुन त्यास जिवे ठार मारले बाबत विजय भिल याचा भाऊ अजय बन्सीलाल भिल रा.जुने भामपुर याने दिलेल्या तक्रारीवरुन शिरपुर शहर पो.स्टे. गुरनं. १४४ / २०२० भादवि कलम ३०२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.

सदर गुन्हयातचा तपास शिरपुर शहर पो.स्टे. चे तत्कलीन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.हेमंत पाटील व त्यांचे रायटर पोहेकॉ / ललीत पाटील, रविंद्र माळी,पोना/ तुकाराम गवळी अशांनी मिळुन केला. सदर गुन्हयाचे तपासात त्यांनी आरोपी नं. १) ओंकार शंकर टाकरे वय ६२, २) अंबालाल ओंकार ठाकरे वय ३२ व ३) ज्ञानेश्वर ओंकार ठाकरे वय २३ सर्व रा.जावदा ता. शहादा जि.नंदुरबार यांना अटक करुन सदर गुन्हयाचा अतिशय कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपीतांविरुद्ध मा.न्यायालयात मुदतीत दोषारोपपत्र दाखल केले.

तसेच प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.ए.एस.आगरकर यांनी सदर खटल्याचे कामकामाजाचेवेळी श्री.गणेश पाटील, सरकारी पोलीस अभियोक्ता जिल्हा व सत्र न्यायालय धुळे तसेच पो.स्टे.पैरवि अधिकारी पोहेकॉ / अजीज शेख यांचे संपर्कात राहुन खटल्याचे कामकाज योग्यरितीने झाल्याने सदर खटल्यात मा.श्री.आर. एच.मोहमंद, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, धुळे यांनी आरोपीतांना भादवि कलम ३०२ मध्ये दोषी ठरवुन जन्मठेप व प्रत्येकी ५,०००/- रुपये द्रव्यदंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली असल्याने सदरचा गुन्हा मा. न्यायालयात शाबीत झाल्याने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.संजय बारकुंड, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली श्री.ए.एस.आगरकर पोलीस निरीक्षक शिरपुर शहर पो.स्टे. चार्ज उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग शिरपुर, शिरपुर शहर पो.स्टे.थे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री.हेमंत पाटील हल्ली नेम.स्था. गु.शा.नाशिक, तसेच शिरपुर शहर पो.स्टे.चे पोहेकॉ / ललित पाटील, पोहेकॉ रविंद्र माळी हल्ली नेम. स्था.गु.शा.धुळे व पोना/तुकाराम गवळी हल्ली नेम.थाळनेर पो.स्टे.पोहेकॉ / अजीज शेख अशांनी मिळून केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध