Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ जून, २०२३

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपा च्या 9 वर्षे यशस्वी कार्यकाळातील सेवा, सुशासन व गरीब कल्याण महासंपर्क अभियानाबाबत आ.काशिराम पावरा यांची पत्रकार परिषद



शिरपूर प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपा च्या 9 वर्षे यशस्वी कार्यकाळातील सेवा,सुशासन व गरीब कल्याण महासंपर्क अभियानाबाबत आ.काशिराम पावरा यांनी पत्रकार परिषद परिषदेत सविस्तर माहिती देऊन विविध कार्यक्रम राबविले जाणार असल्याची माहिती यावेळी दिली.

शिरपूर विधानसभा क्षेत्रात आ. अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, शिरपूर विधानसभा निवडणूक प्रभारी प्रभाकरराव चव्हाण,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के.डी. पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरपूर आमदार कार्यालयात 13 जून 2023 रोजी दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद संपन्न झाली.

यावेळी आमदार काशिराम पावरा म्हणाले,भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार देशभर व राज्यभरात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.राष्ट्राच्या उभारणी साठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी उल्लेखनीय कार्य केले.त्यांनी देशाला महाशक्ती बनविण्यासाठी आपला प्रत्येक क्षण दिला असून लाखो नागरिक यांच्या साठी वैयक्तिक लाभाच्या योजना सुरू करून देशाला जागतिक स्तरावर प्रगत राष्ट्र म्हणून ख्याती प्राप्त करून दिली आहे.गरिबांची सेवा- निराधारांना आधार, सर्वांना सुलभ उत्तम आरोग्य सेवा, महिलांना सबळ करून देशाच्या प्रगतीत हातभार लावला.तरुणांना, सर्व नागरिकांना,शेतकरी बांधवांना स्वावलंबी व प्रगत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. शासनाकडून थेट मदत नागरिकांपर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत पूर्णपणे पारदर्शकपणे पोहचत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंख्य योजना अंमलात आणून नागरिकांना व देशाला प्रगत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारने 30 मे 2023 रोजी 9 वर्षे पूर्ण केले आहेत.हे नऊ वर्ष सर्व समावेशक,प्रगतिशील आणि शाश्वत विकास आणण्यासाठी समर्पित करण्यात आले आहे. सरकारने सर्व नागरिकांसाठी समानता आणि आशा निर्माण करून वचनबद्धतेत स्थिर राहिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी समर्पित आहे. एकीकडे जागतिक पटलावर देशाचा अभिमान सातत्याने वाढत असताना दुसरीकडे सांस्कृतिक वारसा प्राधान्याने बदलताना पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि नव्या भारताचे स्वप्न साकारताना दिसत आहे, अशी माहिती शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांनी यावेळी दिली.

शिरपूर विधानसभा निवडणूक प्रभारी प्रभाकरराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीच्या महासंकल्प संपर्क अभियाना बाबत सविस्तर माहिती दिली. भारतीय जनता पार्टीच्या महासंपर्क अभियान अंतर्गत ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन, बुद्धिवंतांचे संमेलन घरोघरी व बूथनिहाय संपर्क, व्यापार संमेलन, लाभार्थी संमेलन, संयुक्त मोर्चा संमेलन,23 जून रोजी बूथस्तरीय संवाद, 30 व 31 मे रोजी मोदीजी आरंभ सभा, त्यानंतर विकास तीर्थ,21 जून रोजी योग दिन कार्यक्रम, प्रभावशाली व्यक्तींच्या भेटी असे विविध कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे,असेही शिरपूर विधानसभा निवडणूक प्रभारी प्रभाकरराव चव्हाण यांनी स्पष्ट केले.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध