Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ जून, २०२३
Home
/
Unlabelled
/
मध्यप्रदेश निर्मित बीयर (दारू) महाराष्ट्र राज्यात अवैध रितीने विक्री करण्याचा डाव शिरपूर तालुका पोलिसानी रोखला...!
मध्यप्रदेश निर्मित बीयर (दारू) महाराष्ट्र राज्यात अवैध रितीने विक्री करण्याचा डाव शिरपूर तालुका पोलिसानी रोखला...!
शिरपूर प्रतिनिधी:- दि.12/06/2023 रोजी रात्री 23.50 वाजेच्या सुमारास मा.सपोनि श्री जयेश खलाणे यांना गुप्त बातमी मिळाली की,सेंधवा (मध्यप्रदेश) येथुन एक पिक अप वाहनात दारुची अवैध रितीने महाराष्ट्र राज्यात विक्री करण्याच्या हेतुने वाहतुक होणार आहे. त्या अनुशंगाने सपोनि श्री जयेश खलाणे यांनी पोसई कृष्णा पाटील, पोहेकॉ 957 सईद शेख,पोकों 1677 योगेश मोरे, पोकॉ/84 संतोष पाटील, पोकों 1464 कृष्णा पावरा पोका 1454 संजय भोई अशांना बोलावुन बातमीची हकीकत सांगुन कारवाई करण्याचे आदेशित करुन बातमी प्रमाणे सदरचे वाहन पकडण्यासाठी सापळा लावण्यात आलेला होता.
दि.13/06/2023 रोजी रात्री 01.30 वाजेच्या सुमारास पळासनेर गावाजवळ मुंबई आग्रा महामार्गावर सार्वजनिक जागी विना नंबरची एक पिकअप वाहन सेंधवा कडुन येतांना दिसल्याने त्याने शेमल्या गावाच्या रस्त्याला गाडी लावुन फरार झालेला होता.त्याचे नाव राजेंद्र पोपट भिल असे बातमीदारांमार्फत समजले असुन सदरचे वाहनात बियर दारु मिळुन आल्याने व रात्र अपरात्र झाल्याने सदरचे वाहन हे पोलीस ठाणे आवारात लावण्यात आलेली होती.
तसेच सदर आरोपीताचा पळासनेर गावी शोध घेतला असता तो पळासनेर येथील त्याच्या राहत्या घरी मिळुन आला व त्यास पोलीस ठाणे येथे आणुन सदर वाहनाची दि. 13/06/2023 रोजी सकाळी पंचांसमक्ष चालक नामे राजेंद्र पोपट भिल वय 37 वर्षे,रा.पळासनेर ता. शिरपुर जि.धुळे याच्या समक्ष तपासणी केली असता त्यात खालील वर्णनाचा व किंमतीचा माल मिळुन आलेला आहे.
1) 2,07,360/- रुपये किंमतीचा MOUNT'S 6000 SUPER STRONG BEER असे इंग्रजी अक्षरात लिहिलेली
एका कॅनची छापील किंमत 120/- रुपये किंमतीची असे एका बॉक्स मध्ये 18 कॅन असुन असे
एकुण 96 बॉक्स (1728 X120)
2) 5,00,000/- किंमतीची एक महींद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची असलेली त्यावरील कॅरी हिरवा रंग असलेली तिच्या मागील बाजुस कोणताही नंबर नसुन पुढील बाजुस MH 4092 असा अर्धवट नंबर असुन तिचा. चेचिस नं. व इंजिन नं मिळुन आला नसुन किं. अं.जु.वा.
एकुण :- 7,07,360/- (सात लाख सात हजार तिनशे साठ रुपये)
येणेप्रमाणे माल जप्त करण्यात येवुन पोहेकॉ / 957 सईद शेख यांनी सरकार तर्फे आरोपी राजेंद्र पोपट भिल, वय-37 वर्षे,रा.पळासनेर ता. शिरपुर जि. धुळे याच्याविरुध्द महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (अ), 65 (इ),108 अन्वये फिर्याद दिलेली आहे.सदरची वियर ही मध्यप्रदेश निर्मित असल्याचे समजुन आले असुन त्या मागील मुख्य सुत्रधाराचा शोध घेत असुन गुन्ह्याचा तपास पोसई/कृष्णा पाटील हे करित आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड सो.मा.अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे सो. श्री अन्साराम आगरकर,पोलीस निरिक्षक तथा अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरिक्षक श्री जयेश खलाने यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे पोसई श्री कृष्णा पाटील,पोहेकॉ 957 सईद शेख, पोकों 1677 योगेश मोरे, पोकॉ 84 संतोष पाटील,पोकों1464 कृष्णा पावरा पोकों 1454 संजय भोई यांनी सदरची कारवाई केलेली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा