Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १३ जून, २०२३
Home
/
Unlabelled
/
म्हसदीच्या सरपंच पतीची कमाल,बनावट सही द्वारे चालवतो ग्रामपंचायतचा कारभार.....!! सरपंच व तिच्या पतीविरोधात कारवाई न झाल्यास न्यायालयात जाणार उपसरपंच चंद्रकांत देवरे यांची पत्रकार परिषदेत माहिती....!!
म्हसदीच्या सरपंच पतीची कमाल,बनावट सही द्वारे चालवतो ग्रामपंचायतचा कारभार.....!! सरपंच व तिच्या पतीविरोधात कारवाई न झाल्यास न्यायालयात जाणार उपसरपंच चंद्रकांत देवरे यांची पत्रकार परिषदेत माहिती....!!
धुळे - गेल्या दोन वर्षांपासून सरपंचांच्या बनावट सही व्दारे म्हसदी ग्रामपंचायतचा कारभार सरपंच पती राजेंद्र देवरे हा चालवत असून त्या सहीच्या माध्यमातून शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी काढून शासनाची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोप म्हसदी येथील उपसरपंच चंद्रकांत देवरे यांनी पुराव्यांसह पत्रकार परिषदेत केला आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्तांसह, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पुराव्यांसह तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने सरपंच व तिच्या पती विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा उपसरपंच देवरे यांनी दिला आहे. म्हसदी येथील होत असलेल्या भोंगळ कारभाराचे वाभाडे त्यांनी पुराव्यांसह पत्रकार परिषदेत काढले आहे.
म्हसदी सरपंच पदाचे आरक्षण महिला राखीव असल्याने सर्व सदस्यांच्या संमतीने शैलजा राजेंद्र देवरे यांना सरपंच पदी विराजमान करण्यात आले. मात्र सरपंच झाल्यापासून त्यांचा कारभार त्यांचे पती राजेंद्र देवरे हेच ग्रामपंचायतचा कारभार चालवत असल्याचा आरोप देवरे यांनी केला आहे. त्यांच्या या कारभाराविषयी आक्षेप घेणाऱ्या सदस्यांना महिला सरपंचाच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्याची धमकी सरपंच पती देवरे देत असल्याचा आरोप देखील पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. बनावट सहीच्या माध्यमातून म्हसदी ग्रामपंचायती मधील सर्वच कामे सरपंचाच्या नातेवाईकांना मिळत असून या बनावट सहीची फॉरेन्सिक लॅब द्वारे तपासणी करून एकंदरीतच भोंगळ कारभार करणाऱ्या सरपंचाला अपात्र करण्याची मागणी तक्रारदार देवरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. सरपंचाची बनावट सही द्वारे ग्रामपंचायतचा कारभार पाहणाऱ्या सरपंच पती विरोधात विभागीय आयुक्तांसह, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुरावे देऊनही सरपंच व तिच्या पती विरोधात कारवाई होत नसल्याने तक्रारदार तथा उपसरपंच चंद्रकांत देवरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.याप्रसंगी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल ठाकूर म्हसदी येथील उपसरपंच चंद्रकांत देवरे, यांच्यासह सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
म्हसदी येथील सरपंचांचा कारभार त्यांचे पती पाहत असल्याचा पुरावे देऊनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने प्रशासन या ग्रामपंचायतच्या कारभारात हस्तक्षेप करणाऱ्या सरपंच पती विरोधात कारवाई करण्यासाठी का करत आहे ? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सरपंच महिलेच्या कारभारात तिचा पती हस्तक्षेप करू शकत नसल्याचा शासन निर्णय नुकताच पारित झाला आहे. शासनाचा हा कायदा सरकारी अधिकारी किती प्रभावीपणे राबवत आहे? या म्हसदी च्या प्रकरणावरून समोर आले आहे. सरपंचासह तिच्या पतीविरोधात कारवाई होणार का ? शासन प्रशासन कारवाई करण्याचे धाडस करेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा