Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १३ जून, २०२३
Home
/
Unlabelled
/
अल्पवयीन मुलीची छेडकाडनाऱ्याना ; निजामपूर येथील चौघांवर गुन्हा दाखल,चौघांची धुळे बाल सुधार कारागृहात रवानगी....
अल्पवयीन मुलीची छेडकाडनाऱ्याना ; निजामपूर येथील चौघांवर गुन्हा दाखल,चौघांची धुळे बाल सुधार कारागृहात रवानगी....
साक्री प्रतिनिधी:- दि१२:- निजामपूर येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर निजामपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघा संशयितांना लागलीच निजामपूर पोलिसांनी अटक करून त्यांना धुळे बालसुधार गृहात रवाना करण्यात आले आहे.
तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने निजामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे की, त्यांची मुलगी गावात क्लास ला जात असताना तिचा रस्ता अडविणे, हातवारे करणे तिचा मानसिक छळ करणे असा प्रकार सुमारे एक वर्ष पासून सुरू होता,निजामपूर गावातीलच रहिवासी असलेले आयान फरीद खाटीक,रेयान अल्ताफ तांबोळी, मुजाहिद्द मोसिन पठाण,व मुजबबील युनूस खाटीक हे तिला त्रास देत होते तसेच आयान हा नेहमी मुलीला रस्त्यात अडवून तू माझ्याशी बोल नाही तर घरात येऊन मारहाण करू अशी धमकी देत होता, दि.३० मे रोजी मुलगी क्लास ला जात असताना आयान याने मुलीच्या समोर वीस रुपये फेकून तू आम्हाला चोकलेट घेऊन ये व आम्हाला खाऊ घाल अशी धमकी दिली यावेळी देखील त्याचे मित्र सोबत होते.
या सर्वाचा त्रास कमी व्हावा म्हणून मुलीने चॉकलेट घेऊन त्यांना दिले तरी देखील त्यांनी त्रास देणे बंद न केल्याने मुलीने सदर प्रकार आपल्या आईकडे सांगितला, अल्पवयीन मुलीच्या आईने निजामपूर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिल्याने निजामपूर येथील आयान फरीद खाटीक,रेयान अल्ताफ तांबोळी, मुझहीद मोहसिन पठाण व मुजबबील युनूस खाटीक सर्व रा. निजामपूर यांच्या विरोधात भांदवि कलम ३५४-डी, ३४१,५०६,३४, बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम १२ व १७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारही संशयित हे १५ ते १८ वयोगटातील असून दोघांनी नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, दरम्यान गुन्हा दाखल होताच निजामपूर पोलीस ठाण्याचे सपोनि हनुमंत गायकवाड यांनी चारही संशयितांना अटक करून सायंकाळी त्यांची रवानगी धुळे बाल सुधार गृहात केली असल्याचे सांगितले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रा.महेंद्र तुळशिराम खेडकर: कला, शिक्षण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम. कला आणि संस्कृतीच्या प्रांगणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा