Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ जून, २०२३

महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांचा भाजप महिला आघाडीने विचारला जाब..!!



साक्री (ता.१५) निजामपूर -जैताणे ता साक्री येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या विनयभंग तसेच महिला पोलिस कर्मचारी विनयभंग, विशिष्ठ समाजाच्या लग्न वरातीत दगडफेक सारख्या गंभीर प्रकरण तालुक्यातील निजामपुर जैताणे येथे मागील अनेक दिवसांपासून सातत्याने घडत आहेत.  महिला व अल्पवयीन मुलींविषयी होणार्या विनयभंग सारख्या  घटनांसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाउपाध्यक्ष तथा माजी महापौर जयश्री अहिरराव ,साक्रीच्या नगर ॳध्यक्ष जयश्री पवार,नगरसेविका तथा भाजप महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ॳॅड पुनम काकुस्ते,नगरसेविका मायादेवी परदेशी, वंदना भामरे, संगिता भावसार,उषा पवार यांनी  निजामपूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांची भेट जाब विचारत समाजात तेढ निर्माण होवू देऊ नका असे अवाहन केले. 
गेल्या अनेक दिवसांपासून साक्री तालुक्यातील निजामपूर जैताणे येथे महिला व अल्पवयीन मुलीवर होणार्या अत्याचाराचे प्रमाण वाढले असुन यातुन पोलिस असलेल्या महिला कर्मचारीही सुटु न शकल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.यसंबधी भाजपा महिला पदाधिकारी यांनी निजामपूर पोलिस स्टेशन गाठत पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांना जाब विचारत, घडलेल्या गुन्ह्या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल असे दोषारोपपत्र दाखल करण्याची मागणी केली.पोलिसांनी सामंजस्याची भुमिका न घेता, घडवलेल्या सर्व प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल करुन अटक करावी.जेणेकरुन पुन्हा अश्या प्रकारे कोणीही गुन्हा करण्यास धजावणार नाही.याप्रसंगी महिला व मुलींवर विनयभंग करणार्या आरोपींना अटक करण्याची मागणी करणार्या सामान्य नागरिकांवर व पदाधिकार्यांना दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत यासारख्या सर्व गंभीर प्रकरणावर निजामपूर पोलिस स्टेशनमध्ये भाजपा पदाधिकारी यांच्या मार्फत सखोल चर्चा करण्यात आली.व महिला व अल्पवयीन मुलीविषयी घडणाऱ्या घटना संदर्भात तात्काळ दखल घेऊन गुन्हे दाखल व्हावे व भविष्यात अशा प्रकारे गुन्हे घडु नये यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशउपाध्यक्ष जयश्रीताई अहिरराव, साक्री नगरॳध्यक्ष जयश्री पवार,अँड पुनम काकुस्ते, मायादेवी परदेशी,वंदना भामरे, संगिता भावसार,उषा पवार यांनी केली . तसेच साक्री तालुक्यातील कालदर ता साक्री येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला यासंबंधी देखील सर्व महिला पदाधिकारी यांनी पीडितेच्या कुटुबियांची भेट घेतली व पीडितेच्या कुटुंबियांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन दिले. या प्रकरणातील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी व पीडितेच्या पुनर्वसन करण्यासाठी शासनातर्फे सर्व मदत करण्याचे आश्वासन यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी दिले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध