Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १७ जून, २०२३
शिरपूर तालुक्यातील बलकुवा ग्रामपंचायत सर्वाधिक भ्रष्टाचारी ग्रामपंचायत...!
शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर तालुक्यातील बलकुवा ग्रामपंचायत ही आजपर्यंतची सर्वाधिक भ्रष्टाचारी ग्रामपंचायत म्हणून समोर आली आहे. असा तक्रारदार यांच्या आरोप आहे यापूर्वी माहिती अधिकारातून या ग्रामपंचायतीचे 63 लाखांच्या शौचालय घोटाळा उघड झाला होता.विभागीय चौकशी होऊन ग्रामसेवकास निलंबित करण्यात आले होते.यानंतर देखील या पंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहून अनेक वेळा भ्रष्टाचाराचे आरोप वारंवार होत होते.मात्र प्रशासनिक कारवाईतील दिरंगाई चौकशीत शब्दांचा खेळ करून दोषींना वाचवण्याची सरकारी पद्धत,आणि भ्रष्टाचारास वाव देणारी टक्केवारी यामुळे वारंवार भ्रष्टाचार फोपावत आहे.
असे तक्रारदाराचे त्यांच्या तक्रारीत म्हणणे आहे.गावातील माहिती अधिकार कार्यकर्ते माधवराव दोरीक यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या चौकशीत या ग्रामपंचायतीतील सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर पुन्हा भ्रष्टाचाराचे व शासकीय अभिलेख लपवण्याचे आरोप झाले आहेत.ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.प्रदिप अशोक चव्हाण,विद्यमान ग्रामसेवक श्री.शिरसाठ,ग्रामसेवक श्री.एस.एन.भामरे यांनी चौकशी कामे दप्तर उपलब्ध करून दिले नव्हते.तक्रारदार श्री.माधवराव फुलचंद दोरीक हे उपस्थित होते,चौकशीकामी जाबजबाब घेतले असता सरपंच यांनी दिलेल्या असा आरोप चौकशी समितीने केला आहे.पंचायत समिती,शिरपुर यांच्या कार्यालयाकडुन दि. 15/07/2022 च्या सादर केलेल्या चौकशी अहवालात 14 वा वित्त आयोग,15 वा वित्त आयोग व पैसा 5% अबंध निधीतून रु.56,56, 801/- खर्च करतांना सरपंच श्री.प्रदिप अशोक चव्हाण व तत्कालीन ग्रामसेवक श्री. एम.एस.मराठे यांनी अनियमितता केल्याचे नमुद केले आहे.
दि.15/07/2022 च्या सादर केलेल्या चौकशी अहवालानुसार वरील तिन्ही योजनेच्या कामांसंबंधी चौकशी अहवालात नमुद केलेप्रमाणे कामनिहाय अंदाजपत्रक,तांत्रिक मान्यता,कार्यारंभ आदेश, मोजमाप पुस्तिका,नं 65, बिले व प्रमाणके इ.कागदपत्रे चौकशीकामी सादर करणेबाबत सांगितले असता,
ग्रामपंचायतीकडुन फक्त 15 वा वित्त आयोगाची मोजमाप पुस्तिका उपलब्ध करुन देण्यात आली, त्यात प्रथम चौकशी सादर अहवालातील खर्च बाजु तपशील अनु.11 ते 15 वर असणारे ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती कामाचा खर्च रु1,08,000/- संबंधी मोजमाप पुस्तिका नोंदवहीत बाबनिहाय खर्चाच्या नोंदी घेतल्या आहेत,मुल्यांकनापेक्षा अधिकचा ग्रामपंचायतीने केलेला दिसुन येत नाही,परंतु त्या कामांचे अंदाजपत्रक प्रमाणके नं.65 इ.चौकशीकामी उपलब्ध करुन दिलेले नाहीत. तसेच 15 वा वित्त आयोग खर्च बाजु तपशील अनु. 22 वरील लाईट फिटींग करणे खर्च रु.59,457/- व अनु. 29 वरील दिवाबत्ती करणे खर्च रु.1,55,700/- या दोन कामांचा खर्चासंबंधी ग्रामपंचायतीने उपलब्ध करुन दिलेल्या मोजमाप पुस्तिकेत पृष्ठ क्र.13 ते 15 यावर गावांतर्गत एलईडी स्ट्रिट लाईट बसविणेचे 03 कामांचे बाबनिहाय नोंदी आहेत, मोजमाप पुस्तिकेवरील नोंदीनुसार एकुण मूल्यांकन रु.3,49,430/- इतके दिसुन येते परंतु सदर कामांचे देखील अंदाजपत्रक तांत्रिक मान्यता आदेश कार्यारंभ आदेश, मुल्यांकन दाखला इ.कागदपत्रे चौकशीकामी उपलब्ध करुन दिलेले नाही, त्यामुळे यापुर्वी सादर केलेल्या चौकशी अहवालात नमुद केलेनुसार 15 वा वित्त आयोगातून केलेला खर्च रु.33,63,601/- ची अनियमितता केले असलेबाबत नमुद केले आहे, त्यातील कामासंदर्भात ग्रामपंचायतीकडुन फक्त 15 व्या वित्त आयोगाची मोजमाप पुस्तिका चौकशीकामी उपलब्ध करुन देण्यात आली त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही आवश्यक असणारे कागदपत्र चौकशीत उपलब्ध करून दिले नाहीत. तसेच पेसा 5% अबंध निधीतून रु.20,06,200/- खर्च केला आहे त्या कामांचे अंदाजपत्रक,तांत्रिक मान्यता आदेश, कार्यारंभ आदेश मुल्यांकन दाखला न.65 दाखला बिले व प्रमाणके इ.दप्तर आवश्यक कागदपत्र चौकशीकामी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिले नाही,त्यामुळे यापुर्वी सादर केलेल्या चौकशी अहवालात रु. 20,06,200/- मात्र रकमेची अनियमितता केली असल्याचे नमुद आहे.
वरील तीनही योजनांमधून ग्रामपंचायत बलकुवे ता.शिरपुर यांनी जानेवारी 2021 ते जानेवारी-2022 या कालावधीत केलेल्या कामांवर रु.56,56,801/- मात्र खर्च केला आहे. सदर कामांसंदर्भात ग्रामपंचायतीने आवश्यक ते कोणतेही कागदपत्र चौकशीकामी सादर केले नाही म्हणून सदर रकमेच्या खर्च करतांना अनियमितता केली असल्याचे नमुद आहे.
अर्जदाराच्या चौकशीकामी दिलेल्या जबाबात त्यांनी नमुद केलेनुसार त्यांचा दिनांक 24/01/2022 च्या तक्रारी अर्जावर चौकशी होऊन त्यानुसार दि. 15/07/2022 रोजी सादर केलेल्या चौकशी अहवालावर चौकशी हवी असे नमुद केले होते,त्यानुसार ग्रामपंचायतीने सरपंच श्री.प्रदिप अशोक चव्हाण व विद्यमान ग्रामसेवक यांना सदर चौकशी केली असता संबंधित कागदपत्रे व दप्तर उपलब्ध न करून दिल्याने
अहवालात नमुद केलेल्या खर्चाच्या अहवालातील रु.56,56,801/- ची अनियमितता चौकशी अहवाल कायम ठेवण्यात येत आहे.वरील सर्व माहिती तक्रारदार यांनी आम्हाला तोंडी पुरवली आहे मात्र याबाबतचे पुरावे आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे.
तसेच सरपंच व ग्रामसेवक व तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर शौचालय दुरुस्तीमध्ये देखील भ्रष्टाचार केल्याच्या आरोप तक्रारदार यांनी केला आहे.
तसेच प्रशासकीय खर्च तरतुदीतुन रु.40,000/-खर्च हा ग्रामपंचायत स्तरावरील विविध समित्यांचे फलक व इतर बॅनर बनविणे यावर खर्च केला आहे.सदरील प्रशासकीय खर्च हा केंद्रचालक मानधन,तसेच संगणक, प्रिंटर व त्यासंबंधीत इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदी,दुरुस्ती यावर करणे अपेक्षीत आहे. ग्रामपंचायतीने सदर खर्चाचे बिल प्रमाणक दप्तरी ठेवलेले आहे, परंतु सदरचा खर्च हा पुर्णपणे बेकायदेशीर असून सदर रु.40,000/- खर्च यात सरपंच श्री.प्रदिप अशोक चव्हाण, तत्कालीन ग्रामसेवक श्री.एस.एन. भामरे यांनी अनियमितता केली असून, सदर रक्कम त्यांच्याकडेस वसुलपात्र ठरते.या याप्रमाणे चौकशी अहवालात आरोप व दोष निश्चित करण्यात आले असून सदरच्या चौकशी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे.असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे
त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट सरपंच व ग्रामसेवकांवर प्रशासन काय कारवाई करते याकडे तक्रारदार सह तालुक्याचे लक्ष लागून आहे.
ही संपूर्ण बातमी तक्रारदार माधवराव दोरीक यांच्या तक्रारीवरून दिली आहे.
मात्र याबाबत संबंधित गावाचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून याबाबत कोणताही खुलासा अथवा प्रतिउत्तर आम्हास प्राप्त झालेले नाही त्यामुळे त्यातील सस्तस्थिती अजून गावाचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून प्रतिउत्तर व खुलासा प्राप्त झाल्यानंतर समोर खरे चित्र स्पष्ट होईल हे निश्चित...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा