Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २४ जून, २०२३

भोई समाजाचे जिल्हाध्यक्ष भाईदास भाऊ भोई यांचा खासदार हीनाताई गावित यांचे शुभहस्ते सत्कार !


   
शिरपूर प्रतिनिधी:- दिनांक 23 जून 2023 रोजी अखिल भारतीय भोई समाजाचे राष्ट्रीय सदस्य सुभाष सुकलाल भोई यांच्या मुलीचे लग्न वेळेवर लावले त्यानिमित्ताने नंदुरबार जिल्ह्याचे खासदार हीनाताई गावित ह्या वधुवरांना शुभ आशीर्वाद देणेसाठी शिरपूर येथे आले असता यावेळेस लग्न वेळेवर लावले याबाबत सुभाष भोई व सर्व समाजाचे कौतुक केले याप्रसंगी आपले सर्वांचे लाडके भाईदास भाऊ यांची भोई समाजाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झालेबाबत हीनाताई गावित यांनी भाऊंचे बुके देऊन सत्कार केला या प्रसंगी माजी मंत्री जयकुमार भाऊ, गोव्याचे खासदार व माजी मंत्री विजय तेंडुलकर साहेब,राहुल आबा रंधे, शिंदखेड्याचे जिल्हा परिषद सदस्य नारायण पाटील साहेब,प्राचार्य बी.डी. आबा पाटील सर उपस्थित होते. 

तसेच अखिल भारतीय भोई समाजाचे प्रदेश कार्याध्यक्ष सी.एम.भोईसर,माजी नगरसेवक गुलाब भोई तरुण गर्जना चे संपादक संतोष भाऊ भोई,प्रदेश सदस्य यशवंत निकवाडे सर,जिल्हा सदस्य संजय नंदुरबारे,संस्थेचे समाजाचे तालुका अध्यक्ष रवींद्र सोनवणे,शहर अध्यक्ष जगदीश मोरे,सचिव दिलीप ढोले,जिल्हा सचिव भोजराज ढोले, प्रा. डॉक्टर राजू वाडिले सर,डॉक्टर एम. डी.दिघोरे सर,संदीप वाडिले आदी सर्व समाज बांधव उपस्थित होते. 

यावेळेस उपस्थित सर्व मान्यवर व समाज कार्यकर्ते  यांची ओळख करून देत आपल्या गोड स्तुतिसुमनाने निकवाडे सरांनी खासदार व आमदार साहेबांचे स्वागत करून सर्वांची मने  जिंकलीत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध