Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २४ जून, २०२३
Home
/
Unlabelled
/
जळगाव जिल्ह्यात विनापरवाना खते व कीटकनाशके घरोघरी जाऊन विक्री करणाऱ्या व साठवणूक करणाऱ्या कंपनीची कृषी विभागांमार्फत कारवाई करण्यात आली
जळगाव जिल्ह्यात विनापरवाना खते व कीटकनाशके घरोघरी जाऊन विक्री करणाऱ्या व साठवणूक करणाऱ्या कंपनीची कृषी विभागांमार्फत कारवाई करण्यात आली
जळगाव जिल्ह्यात विनापरवाना खते व कीटकनाशके घरोघरी जाऊन विक्री व साठवणूक करणाऱ्या कंपनीवर कारवाई.
जळगाव जिल्ह्यातील आव्हाने गावात विनापरवाना शेती उपयोगी खते व कीटकनाशके घरोघरी जाऊन विक्री व अनधिकृत जागी साठवणूक केलेली असल्याचे गुप्त माहिती जिल्हा गुन्हा नियंत्रण निरीक्षक श्री अरुण तायडे यांना मिळाली सदर माहितीच्या आधारे व विभागीय कृषी सहसंचालक मा. श्री मोहन वाघ साहेब,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव श्री संभाजी ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सापळ्याची नियोजन करण्यात आले.
जिल्हा व तालुका भरारी पथकातील सदस्य श्री अरुण तायडे, जिल्हा गुन्हा नियंत्रण निरीक्षक,श्री विजय पवार मोहीम अधिकारी, श्री शिवाजी राऊत,तालुका कृषी अधिकारी जळगाव,मिलिंद वाल्हे,मंडळ कृषी अधिकारी,धीरज बादे,कृषी अधिकारी पंचायत समिती अमित भामरे कृषी पर्यवेक्षक, बालाजी कोळी दीपक झंवर कृषी सहायक यांनी आव्हाने गावातील सदर अनधिकृत गोदामातील वेलसन फार्मर फर्टीलायझर कंपनीचा 1543257/-किमतीचा खत व कीटकनाशक साठा जप्त केला असून जळगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ,खोटे नगर या ठिकाणी श्री अरुण तायडे यांनी फिर्याद दाखल केली असून पुढे तपास सुरू आहे या अनधिकृत खत विक्रीमध्ये किती कंपन्या जिल्ह्यात सक्रिय आहेत याचाही शोध कृषी विभागामार्फत सुरू आहे तसे आढळल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाला कळवावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा