Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २० जून, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहर पो.स्टे.चे शोध पथकाची कौतुकास्पद कामगिरी....सरकारी नोकरांस जातीवाचक शिवीगाळ करुन हल्ला करणारा ४ वर्षापासुन फरार आरोपी केले जेरबंद..
शिरपूर शहर पो.स्टे.चे शोध पथकाची कौतुकास्पद कामगिरी....सरकारी नोकरांस जातीवाचक शिवीगाळ करुन हल्ला करणारा ४ वर्षापासुन फरार आरोपी केले जेरबंद..
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपुर शहर पो.स्टे.चे पो.नि.ए.एस.आगरकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,शिरपुर शहर पो.स्टे. गुरनं. ३०९/२०१९ अ.जा. अ.ज.अ.प्र.का.क. ३ (१) (आर) (एस), भादवि कलम ३५३,३३२,१४३,१४९,३७९,५११,३२३, ५०४, ५०६, ४२६ सह, महाराष्ट्र गौण खनिज अधिनियम कलम ३, ४, ७ व म.पो.का.क.३७(१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हयात ४ वर्षापासून फरार असलेला आरोपी नामे- मंगलसिंग भिमराव भिल वय २५ रा. वरझडी ता.शिरपुर जि.धुळे हा वरझडी गावात आलेला असल्या बाबत मिळालेल्या बातमीवरून वरिष्टांचे मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे अंमलदार यांनी वरझडी गावात जावुन सापळा लावून सदर फरार आरोपीतास शिताफीने ताब्यात घेवुन शिरपुर शहर पो.स्टे.ला हजर करुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
दि.०७/१२/२०१९ रोजी १४.३० वाजेचे सुमारास तक्रारदार - श्री. पंकज संतोष महाले, तलाठी सजा करवंद तहसिल कार्यालय शिरपुर जि.धुळे वरनमुद आरोपी हा त्याचे साथीदारांसह करवंद शिवारातील अरुणावती नदीचे पात्रात अवैधरित्या गौण खनिज (वाळु ) ची चोरी करून ट्रॅक्टर मध्ये भरत असतांना तक्रारदार हे त्यांचे सोबतचे साक्षीदार अशांसह गौण खनिजची चोरी पकडून कारवाई करण्यासाठी शासकीय काम करीत असतांना तक्रारदार हे अनुसूचीत जातीचे (चांभार जातीचे) असल्याचे माहित असतांना त्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन, हाताबुक्यांनी मारहाण करुन ते करीत असलेले शासकीय कामात अडथळा निर्माण करुन त्यांचे ट्रॅक्टर पळवून घेवून गेले बाबत तक्रारीवरुन वरप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.संजय बारकुंड,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर शहर पो.स्टे.चे श्री.ए.एस.आगरकर,पोलीस निरीक्षक तसेच शोध पथकाचे पोहेकॉ ललित पाटील,लादूराम चौधरी,पोना/ मनोज पाटील,पोकों/विनोद अखडमल,गोविंद कोळी,योगेश दाभाडे, भटु सोळंके,प्रशांत पवार,सचिन वाघ व होमगार्ड शरद पारधी व मिथुन पवार अशांनी मिळुन केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा