Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २० जून, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरात वाढत्या चोऱ्यांचे सत्र थांबावे व जातीय सलोखा टिकून राहावा या हेतूने एक कॅमेरा पोलिसांसाठी....! या अभियानाची आज सुरुवात करण्यात आली
साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरात वाढत्या चोऱ्यांचे सत्र थांबावे व जातीय सलोखा टिकून राहावा या हेतूने एक कॅमेरा पोलिसांसाठी....! या अभियानाची आज सुरुवात करण्यात आली
धुळे :- निजामपूर जैताणे परिसरात वाढत्या चोऱ्यांचे सत्र थांबावे व जातील सलोखा टिकून रहावा या विषयावर चर्चा करण्यासाठी निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्याक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात निजामपूर जैताणे गावातील राजकीय, सामाजिक,तथा व्यापारी क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.यावेळी सपोनि गायकवाड यांनी वाढत्या चोऱ्याबद्दल उपाययोजना सांगितल्या त्यात प्रथम एक कॅमेरा पोलिसांसाठी सर्व व्यापारी,बँका,पतसंस्था, दुकाने,ज्वेलरी शॉप,यांनी बसवावा जेणेकरून चोरीच्या घटनांना आळा बसेल व घडणा घडल्यास चोरांच्या मुसक्या आवळण्यास मदत होईल,तसेच सध्याच्या स्थितीत जातीय तणाव निर्माण करण्याचे कार्य काही घटक करत असून आपण सर्वांनी शांतता अबाधित ठेवावी,निजामपूर पोलीस दल सक्षम असून गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, तसेच आपण सर्वांनी कसल्याही अफवा व सोशल मीडियावरील घटनांचा अपप्रचार करू नये असे आवाहन गायकवाड यांनी यावेळी केले,या बैठकीत प्रा.भगवान जगदाळे,पत्रकार रघुवीर खारकर,माजी सरपंच संजय खैरनार,रविंद्र जाधव, सागर बोरसे आदींनी मनोगत व्यक्त केले, या बैठकीस पोलीस उपनिरीक्षक काळे साहेब, मा सरपंच अजितभाई शाह,सरपंच प्रतिनिधी भूषण वाणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र शाह,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय रेलन, शिवसेनेचे माजी जिल्हा उप प्रमुख प्रकाश पाटील,भालचंद्र कोठावदे,समता परिषद जिल्हाध्यक्ष राजेश बागूल, निजामपूर ग्रा प सदस्य ताहीर मिर्झा, महेंद्र वाणी, राजेंद्र शाह,डॉ मनोज भागवत,विकासो माजी चेअरमन शांतिलाल भदाणे,दिलीप वाणी, विपुल विसपुते, हस्ती बँक व्यवस्थापक पराग शाह,पत्रकार परवेझ सैय्यद, अकबर पिंजारी,अनिल राणे व मोठ्या संख्येने व्यापारी तथा सर्व क्षेत्रातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा