Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २२ जून, २०२३
Home
/
Unlabelled
/
बकरी ईदच्या महिन्यात आरटीओ,पोलिस व पशु वैद्यकिय डॉक्टर हे सर्व मालामाल ! बेकायदेशिरपणे अनाधिकृत गुरे-ढोरे व बोकडांची कत्तलीसाठी सर्रास वाहातूक !
बकरी ईदच्या महिन्यात आरटीओ,पोलिस व पशु वैद्यकिय डॉक्टर हे सर्व मालामाल ! बेकायदेशिरपणे अनाधिकृत गुरे-ढोरे व बोकडांची कत्तलीसाठी सर्रास वाहातूक !
शिरपूर प्रतिनिधी:- सद्या बकरी ईदचा महिना असल्याने मध्यप्रदेश,राज्यस्थान तसेच महाराष्ट्रातील सिमावर्ती भागातून कत्तलीसाठी मोठ्याप्रमाणावर गुरे-ढोरे, व शेळ्या-बोकड यांची अतिशय अमानवी पध्दतीने गाडीत अक्षरश: पालापाचोळ्याप्रमाणे भरुन वाहतूक होत आहे.या वाहान चालकांकडे कोणत्याही प्रकारचे परमीट अथवा पासेस नसतांना देखील ही वाहाने अत्यांत राजरोसपणे वाहतूक करत आहेत.खरे पाहिले तर महाराष्ट्र सिमेत प्रवेश केल्यानंतर प्रथम सांगवी पोलिस स्टेशन लागते.येथे अत्यंत प्रामाणिक पोलिस दलाचे अधिकारी अक्षरश: रस्त्याच्या कडेला लागून येणा-या जाणा-या वाहनाची तपासणीसाठी उभे असतात,मात्र वाहन चालकांने चालू गाडीतून हात बाहेर काढून ठरलेल्या दरानुसार रक्कम दिली की,अतिशय इमादरपणे ते पोलिस वाहनाकडे पुर्ण कानाडोळा करुन वाहन सोडण्याचा इशारा आपल्या साथीदारा करतात व वाहन तेथून पास होते.
तेथून पुढे महाराष्ट्रातील हाडाखेडजवळ सिमाशुक्ल तपासणी नाका आहे. याठिकाणी चोवीस तास दुतर्फ़ा आरटीओ आपल्या डोळ्यात तेल घालून ठिय्या मांडून बसलेले असतात, मग असे असतांना देखील अनाधिकृत गुरे-ढोरे वहातूक करणारे वाहाने कशी काय पास होतात,हेच खरे नवल आहे. याचाच अर्थ या वाहान चालकांकडून हजार-बाराशे रुपये घेऊन गाडी सोडली जाते.व आपल्या नजरेतून कोणतेही वाहान इन्ट्री फ़ी न देता पास होऊ नये यासाठीच हे आरटीओ आपल्या डोळ्यात तेल घालून बसलेले असतात. हे आता आम्हालाच नव्हे तर सर्वसामान्य जनतेला देखील कळू लागले आहे.
त्यातच एक पशूवैद्यकिय चिकित्सक (डॉक्टर ) शेजारच्या हॉटेलच्या कोप-यावर बसलेले असतात.हे डॉक्टर साहेब इतके तज्ञ व अंतरयामी आहेत की,यांना त्यावाहाना जवळ जाऊन तपासणी करण्याची गरज पडत नाही. त्यांना एका वाहानापोटी दोन-तीनशे रुपये मिळताच ते आपले डोळे बंद करतात व त्या वाहातील हाल-हावाल आपल्या अंतरमनाने तपासून त्या हॉटेलच्या कोप-यावर बसल्या बसल्या वहान सोडण्याचा इशारा देतात.
येथून पुढे या वाहानांना दहिवद ट्राफ़िक पोलिस चौकी जवळ थांबा दिला जातो. याठिकाणी देखील अतिशय प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावण्यासाठी पोलिस रस्त्याच्या कडेला दुतर्फ़ा उभे असतांतच मात्र सांगवी पोलिस चौकी जसी पास केली त्याचप्रमाणे बेचा-या वाहान चालकांना ठरलेल्या रेट प्रमाणे इन्ट्री फ़ि दिली की इमानदार ट्रॉफ़िक पोलिस देखील आपले डोळेबंद करतो व आपल्या साथीदारास वहान सोडण्याचा इशारा देतो.अश्या पध्दतीने ही वाहाने सर्व अडथळे व ब्रेकर्स ऒलांडून पुढे सरकत असतात.
बकरी ईदचा महिना असल्याने बिचा-या वाहानचालकांना बकारा बनवत ही सर्व वाहाने रत्यावर उभे असलेल्या लांडग्याना दानापानी करत आपले वाहाने पुढे मार्गस्थ करत असतात. त्यामुळे हे लांडगे बकरी-ईदच्या महिन्यात मालामाल होत आहेत.असे जनतेकडून टोचून बोलले जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा